Nojoto: Largest Storytelling Platform

Best एकटाच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एकटाच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Prajval Nargade

तू बोली नाहीस 
मी आयकून घेतल
तू होती समोर 
हृदयात मी मानून घेतल
फेकलेल शिक्षण
हातात मी परत घेतल
तू बदली‌ नोव्हतीस
मी स्वताला बदलून घेतल
तू आहेस एकटीच 
मी पण‌ स्वताला एकटंच
आता मानूण घेतल #एकटाच
#nojotonews  )

thoratarya777

#poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry मिडी गेली, साडी गेली,
फ्रॉक तर दिसेनासाच झाला l
बघता बघता अवघ्या महाराष्ट्राचा *पंजाब* होऊन गेला ll

कुंकू गेलं, टिकली आली, तीही न्हाणी घरात गेली l
आणि अवघी न्हाणी
*सुवाशीण* झाली ll

 बाबा कधीच गेला, बिचाऱ्या आईनं अंथरून धरलं l
काल जन्माला आलेल मूल *मम्मी-पप्पा* बोलू लागलं ll

 फेटा राहिला कार्यापुरता,
गांधी टोपीचे दिवस सरत आले l
पंचविशीच्या पोरांचे 
*केस* फारच पिकू लागले ll

 गावात रंगलेला गप्पांचा पार,
कधीचाच ओस पडला l
हिंडता फिरताना माणूस *एकटाच* बोलू लागला ll

यंत्र आणि तंत्रामुळे
कष्ट फारच कमी झाले l
धक्का-धक्की च्या जीवनात *मरण* बाकी स्वस्त झाले ll

 कंप्युटर आणि इंटरनेटमुळे,
जग फारच जवळ आलं!
माणसांच्या या गर्दीत 
*माणूसपण* हरवून गेलं ll

अहो, असाकसा हा
फॅशनचा जमाना आला l
एवढी गर्दी असूनही 
माणूस *एकटाच* राहिला ll

SK

तुझ्या आठवणीतला मी प्रेमवेडा.. #poem

read more
वाटत कधी कधी
जाव दूर सोडूनी सर्व एकांतात
शांत अशा
अथांग पसरलेल्या त्या
सागरी किनारी
आणि
एकरुप होऊन जावे त्या
सागराच्या लाटां सोबत
नी
आठवाव्यात त्या आठवणी 
ज्या आज अश्रुंचा पाजर फोडत आहेत
आणि
विचारावे प्रश्न स्वतःच्या मनाला
जे तिच्या शोधात आजही
भरकटत आहे
शोधावी उत्तरे त्या
अनुत्तोरीत प्रश्नांची
नी यावे परतुनी पुन्हा नव्याने
त्या सागरी किनाऱ्यावर
जिथे पूर्वी मी एकटाच होतो
अन्
आजही मी एकटाच आहे.
SK तुझ्या आठवणीतला मी प्रेमवेडा..

Govinda Polad

read more
गडे तुझे ऐनवेळी जाणे असे बरे नाही ठरले 
मैफिलीत सुखाच्या ते गाणे दुःखाचे असे बरे नाही ठरले ,
मी रोखला श्वास जेव्हा सगळेच आले होते 
पण तुझे शेवटी येणे असे बरे नाही ठरले ।।१।।

मी आणला प्रत्येक तारा तुझ्या स्वप्नांचा 
पण प्रलोभन तुझे आकाशाचे बरे नाही ठरले ,
मी साधला मेळ हळव्या भावनांचा ,
पण काळजाचे खेळ तुझे असे बरे नाही ठरले ।।२।।

तू रुसलीस जेव्हा मीही रूसलो होतो 
तू हसलीस जेव्हा मीही हसलो होतो ,
मग अबोल तुझे वागणे असे बरे नाही ठरले 
तुझे ऐनवेळी जाणे असे बरे नाही ठरले ।।३।।

तू आलीस जेव्हा मी एकटाच होतो 
तू गेलीस तेव्हाही मी एकटाच होतो ,
पण वियोगात मला सोडणे असे बरे नाही ठरले 
तुझे ऐनवेळी जाणे असे बरे नाही ठरले ।।४।।

- गोविंद पोलाद


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile