Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझा_देव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझा_देव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

शब्दवेडा किशोर

White आद्यस्वरूपात गणेशा तू आमच्या हृदयात विराजतो आमची सारी दुःख कष्ट तू हरतो 
सहज मज मनी आलं देवा तुझा जन्म होतो कसा होतो हे मी बघावा 
मनी ध्यास तुझी मूर्ती कशी घडते ते बघण्याचा लागला 
अन् लागलीच मी स्वतःला रायगड प्रांताच्या पेन या गावी स्वतःच्या जीवाचा रथ आणला 
इथ आल्यावर मज समजलं की पूर्ण पेनमध्ये घराघरात
तू नेहमीच नव्या स्वरूपात रोजच नवा जन्म घेतोस 
घेऊनी नवा जन्म भक्तांची कष्ट हरण्या तू रोजच
नव्यानं सजून गणेशचतुर्थीच्या वेळेची वाट बघत हरघरात असतोस 
इथला हर एक कलाकार जेव्हा तुझी मूर्ती घडवण्या शादुची ती मती हाती मनोभावे घेतो 
माझ्या मते तरी देवा तुझ्या सुंदरतेचा आलेख तेव्हाच आकारला जातो 
हाती मातीचा गोळा घेऊन साच्यात भरताना व मूर्ती बाहेर काढून
ती पूर्ण बारकाईने फुलवताना इथल्या हर एक कलाकाराच्या नजरेत
देवा एक वेगळाच भाव असतो
मला वाटत देवा तूच तुझा नवा घेण्या त्या प्रत्येक कलाकारांच्या हातात
रोजच हर मिनिटाला नव्यानं संचारतो 
माहिती असतं देवा की तुझं हे स्वरूपात एक दिवस पाण्यात अंतर्धान पावणार
पण तरीही पूर्ण श्रद्धेने प्रत्येक कलाकार तुला घडवत असतो
माझ्या मते देवा हर घडी हरेक क्षणाला एक नवं बळ या सर्व कलाकारांना देऊन
आमचे कष्ट हरण्या या कलाकारांच्या हातून रोजच नव्या स्वरूपात जन्म घेतो
आद्यस्वरूपात गणेशा तू आमच्या हृदयात विराजतो 
आमची सारी दुःख कष्ट तू हरतो
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझा_देव

शब्दवेडा किशोर

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile