Nojoto: Largest Storytelling Platform

Best mayurlawate Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best mayurlawate Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 4 Stories

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

White *✨ लाल परी आणि माझे UPSC चे दोन वर्ष ✨*

रोज सकाळी ती लाल परी बस स्टॅंडवर मला भेटायची,
कधी वेळेत, कधी लवकर, कधी खुप उशीर करायची...
डोळ्यात स्वप्न घेऊन मी तिच्या मागे धावत राहायचो,
तिची वाट बघायचो, आणि तिच्याच शोधात राहायचो...


ती गाडी झटके घेत पुढे, माझं मन मात्र विश्रांती घ्यायचं,
रोज तिच्या कुशीत मनमोकळे पणे समदं जग फिरायचं...
आधी तिचा करकर आवाज डोक्याला ताण वाटायचा,
पण नंतर, तिच्या आवाजाचा गारवा काळजाला भिडायचा…

पहिल्या वर्षी ती केवळ एक गाडी वाटायची,
पुस्तकांच्या डोंगराखाली लपलेली माझी स्वप्ने दिसायची...
इतिहास, भूगोल, राजकारणाच्या गल्ल्यांत मी हरवायचो,
आणि ती लाल परी, रोजच्या धावपळीतून माझ्या मनात मी उतरवायचो…

दुसऱ्या वर्षी मात्र ती जणू माझी साथीदार भासायची,
प्रत्येक यश - अपयशाच्या साक्षीला तिच्या इंजिनची सोबत असायची...
रात्रीच्या अभ्यासाच्या थकव्याला तिच्या ब्रेक लाइटचा लाल रंग सोबत असायचा,
 "थांबू नकोस, धावत रहा, मी सोबत आहे" असं तिच्या बोलण्याचा भास व्हायचा...

त्या दोन वर्षांत माझा दिवस तिच्याशिवाय अपूर्ण वाटायचा,
जणू तिचा साथ UPSC च्या प्रवासाचा अविभाज्य घटक वाटायचा...
आणि जेव्हा थकून मन कधी माझे हतबल व्हायचे,
तेव्हा मला तिचे रोज नव्या प्रवासाचे नवे धडे आठवायचे…

लाल परी म्हणजे फक्त गाडी नव्हती,
ती माझ्या संघर्षाची मूक साक्षीदार होती,
परीक्षा देताना मनात एकच विचार “जिंकून परतेन,
आणि त्या लाल परीला पुन्हा एकदा नक्कीच भेटेन… 

कारण लाल परी आणि माझ्या UPSC च्या दोन वर्षांची गोष्ट,
ही फक्त प्रवासाची नव्हती, तर स्वप्नांच्या पाठलागाची होती…

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Thinking #Love #Life #kaavyankur #mayurlawate #Poetry #Bus #upsc

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

*भोलेनाथाची वरात...*

डमरूचा नाद, तांडवाची लय,
भोलेनाथाची वरात निघाली घेऊन भय!
नंदीवर स्वार महादेव, भस्मात लिपटले,
गंगामाई जटेतुनी खळखळ ओघळले!

भूत-प्रेत, पिशाच्च ही सगळीच मंडळी सोबतीला,
नाचत, गात, हर हर महादेव करती सारे वरतीला!
कोणी झांज, डमरू वाजवती, कोणी शंख फुंकती,
अघोरी, नागा, भूत सारे मिळून जल्लोष खुप करती!

दाही दिशा दणाणल्या जयघोषांनी,
कैलास सोडला शंभूने वरातीसाठी!
अग्निहोत्री, सिद्ध, साधू, देव अन् गंधर्व,
सारे सामील या अद्भुत वरातीच्या प्रवासात!

पार्वतीचा साज, मखर सुशोभित,
शिवशंभूची माया, रूप मोहक!
वरातीचा राजा, अनादि अविनाशी,
भक्तांसाठी चालले, सृष्टीच्या साथी!

विजांचा गडगडाट, नभातली चमक,
शिवशंकराच्या विवाहाचा उत्सव थरारक!
कधी विरक्त, कधी भक्तांचा आधार,
भोलेनाथच आहेत सर्वांचे उद्धार!

"हर हर महादेव! जय शंकर!"

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #mahashivratri #Love #kaavyankur #Poetry #mayurlawate #Life

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

*"मानवता हिच खरी जात..."*

जातपातिच्या या जंजाळात,
माणुसकी कुठं हरवली?
मनामनांत भिंती उभ्या,
ही दुनिया कुठं भरकटली?

ना रक्त वेगळं, ना श्वास वेगळा,
ना दुखं कुणाची कमी-जास्त,
पण तरीही भेद उराशी घेऊन,
का लावतो आपण धर्म, जात?

एकच सूर्य तापतो इथे,
एकच चंद्र शीतलता देतो,
एक माणुस दुसऱ्या माणसाला,
का वेगळ्या ढाच्यात मांडतो?

कोण आपला, कोण परका,
हे ठरवायला इथे कोण आले?
मानवता हाच खरा धर्म आपला,
हे जग कधी समजून घेईल का भले?

हात जोडून एकच तुम्हां मागतो,
खरा माणूस म्हणून मोठं व्हा,
जात-पात, धर्म विसरून सारे,
माणुसकीचं एक बीज बना!

"धर्म अनेक, विचार अनेक, पण माणुसकी एकच असावी,
जात नको, पात नको, फक्त प्रेम आणि शांतता वाढावी!"

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #SushantSinghRajput #kaavyankur #mayurlawate #Poetry #Love #Life

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

*अचानक तिची भेट…*

बस स्थानकावर गर्दीत उभा होतो,
अनाहूतपणे तिचं नाव घेत होतो…
क्षणभर वाटलं, हसतोय वेड्यासारखा,
आणि अचानक ती समोर दिसली स्वप्नासारखी…

नजरेला नजर भिडली, काळ थबकला,
गर्दीचा कोलाहलही शांतसा वाटला…
हसली हलकसं, जणू संध्याकाळचा गारवा,
त्या हसण्यात अजूनही होतं ते जुनं आपलंसं बावरेपण…

"कशी आहेस?" मी विचारलं नकळत,
ती म्हणाली, "छान! तूही बदलला नाहीस बरं?"
दोघंही गप्प झालो क्षणभर, पण चेहऱ्यावर समाधान होतं,
त्या जुन्या दिवसांच्या आठवणींनी मनही भरून आलं होतं…

विचारणा घेत बसलो, हळुवार गप्पा रंगल्या,
वेळ उलटत होता, तरी आठवणी भूतकाळातच अडकल्या…
भूतकाळ आठवला तरी, वर्तमान हसू लागलं,
भेट काही मिनिटांची, पण आठवणींनी दोघांनाही फुलवलं…

ती निघाली, मीही निघालो, पण मन मात्र मागेच होतं,
गर्दीत हरवूनही, आत कुठेतरी गारवा शोधत होतं…
दोघांनीही मागे वळून पाहिलं एकवार,
आणि समजलं, काही बंध कधीच नसतात विस्मृतीपार...

©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Moon #kaavyankur #mayurlawate #Love #Life #Poetry #marathi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile