Find the Best सगळं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदोघात तिसरा आता सगळं विसरा, सगळं करून भागले, सगळं होतं, आपलं सगळं, सगळं कळत,
Yogesh Hiwrale
"आज सहज बसलो होतो, त्या नदी च्या काठी, आठवल्या तुझ्या नि माझ्या भेटी गाठी. पाण्याचा बहाणा करून, कशी चोर पाउलांनी येत होतीस. मी दिसताच, सोबत आणलेली घागर, रिकामीच नेत होतीस. तू शतदा केलास प्रयत्न, माझी वाट पाहण्याचा. तू शतदा केलास प्रयत्न, माझ्या आधी येण्याचा. प्रयत्न तुझा फसत असे,नदी काठी तुझ्या आधी मीच तुला दिसत असे. राग ही तुझा किती देखणा असायचा माझ्या पायात रुतलेला काटा तुझ्या डोळ्यात सलायचा सगळं चित्र डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं आज एकटाच होतो म्हणून नदी समोर वाटली थोडी लाज तू दिलेली रबराची अंगठी, अजूनही माझ्या, करंगळीत आहे. सोनंचांदी,सगळं खोटं,हीच खरी संपत्ती माझ्या ओंजळीत आहे आता कारणमीमांसा कशाला,होईल मोकळा, कधी हा श्वास केव्हा तरी येईल दिवस तो,हीच एकमात्र आस " एक आठवण रोजची
एक आठवण रोजची
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
मला हेच वाटतंय कधीकधी, आजपर्यंत जे माझ्या मनात दडलं आहे, ते कुणालातरी सांगावं, माझ्या काळजातलं सगळं गाळ उपसून काढावं, जड झालेलं हे मन हलकं करावं, वाहून जावू द्यावं सगळं भळाभळा मनाच्या बाहेर, पण, कोणाला सांगावं? कोण माझ्या भावना समजून घेईल? भेटेल काय कुणी ज्याच्याजवळ खरंच वाटेल की, हे आपलं मन हलकं करावं, खरच वाटतेय कधीकधी मनातलं सगळं सांगून टाकावं... आणि मोकळं व्हावं ह्या गर्दीतून.. (प्रीत )
Vinayak Das
गुंतण महत्वाचं.कळतयं पण... 😊 पण आलाचं ना. हो, कळतयं पण भीती वाटते.. नाहकच असेल कदाचित पण आहे. आजच पहिल्यांदा भेटलो आणि गुंतलो.. खुप बोलावं वाटतं अश्या वेळी, पण विषय सुचतं नाहीत. तसे मला सावरायला जुने प्रश्न दिमतीला येऊन उभे होतेच या ही वेळी. 'तिला काय वाटेल?''काही गैरसमज तर नाही ना करुन घेणार ती?''हि पहिलीच भेट खरं तर, ही योग्य वेळ आहे का?' आणि तोच जुना प्रश्न 'खरंच आहे का आपली पात्रता,त्या योग्यतेची?' आणि या सर्वांसोबत एक नवाच प्रश्न आज नव्याने आला, 'तू पुन्हा प्रेमात कसं काय पडू शकतोस, काय ही तुझ्या पहिल्या प्रेमाची प्रतारणा तर नाही ना?' (खरं तर हा प्रश्न निरर्थक, पण तरीही आपलं अस्तित्व सिद्ध करून गेला) प्रश्न, पहिलेही मला निशब्द करायचे आणि आज ही त्यांनी तेच केलं.ती मात्र निर्भिडपणे माझ्याशी संवाद साधत होती. शेवटी आपलंच मन आपली गोची करतं हे मात्र खरं. मी फक्त तिच्या प्रश्नांना उत्तर करत होतो. तिच हसणं न्याहळत होतो, कदाचित ती माझ्या अवघडलेपणावरचं तर हसंत नाहिये ना, असं ही वाटुन गेलं. पण छे हो, इतक नितळ, निरागस हास्य ते, त्यावर इतका कोता संशय घ्यावा.. माझीच मला लाज वाटली. मी निर्धाराने भावनांना सावरून होतो. भीत सुध्दा होतो... काय सांगव, हा बांध कधी तुटेल ही. बराच काळ या सुख वर्षावा भिजत असतांना, वेळ आपलं कार्य साधतचं होती, अविरत वाहण्याचं. खरं तर ज्या वेळी वाटंत असत, वेळ जरा काळ थांबावा तो तेव्हाच इतक्या लवकर निघुन जातो ना.... असो, दोन तासच ते, फक्त तिच सोबत असणंच, मनाला उधाण देणारं होतं... गुतांयच नाही अस मनाशी ठरवलेलं असतांना ही, तिच्यात नकळत गुंतत जाणं, अनोखं होतं, विस्मयातीत करणारं होत, बाकी सगळं विसरायला लावणारं होतं. आज हे सगळं तुला सांगायच ठरवुनच आलो होतो, शेवटी तुच तर हक्काची मैत्रिण आहेस ना माझी... माझ्या प्रिय डायरीस् तुझा 'राही औरंगाबादी' #involvement is needed
#Involvement is needed
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited