Nojoto: Largest Storytelling Platform

Best लोकं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लोकं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लोक लग्न का करतात, लोक किती, लोक गाना, लोक म्हणतात, लोक विषयी माहिती,

  • 4 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Sachin Zanje

असतात अशी ही लोकं.

जो आहे जसा
तो देत असतो तसा.
नाही मिळाले मला तसे ? असे म्हणणे 
शोभत नाही  तुला हे माणसा.

वाटाड्या होऊन मार्ग शोधणे
असा संघर्ष नको वाटतो बिनकाम्याला.
जो शोधतो ,नवीन काही करतो असे बघुनी
नावे ठेवतात त्यांच्या जगण्याला.

दुसऱ्याच्या काहीतरी करण्यामध्ये 
अडथळा आणणे जमते अशा लोकांना.
डोकं जिथं आपले सुधारण्यासाठी हवे 
ते चालते दुसऱ्याच्या वाईट करण्यांना.

दाखवतात हुशार लोक  दुसऱ्यांच्या चुका
आपले सांगण्यासाठी तो नेहमी असतो मुका.
अशाच लोकांना होते जास्त दुःख
जगण्यात आपले अर्धवट पोट परंतु दिसते दुसऱ्यांची भुक.

सकारात्मक बघण्याची  व्हावी सर्वांची  दृष्टी
आपोआपच  सुंदर दिसू लागेल सृष्टी.
जो दिसेल , जो असेल किंवा जेवढे असतील कष्टी 
थोडं तरी कमी करू शकेन असा घडो मी त्या संकटी.

कवी :- श्री सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje #लोकं.#शुभविचार.#सुविचार.

#NationalSimplicityDay

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
रस्त्यावर दगड पडलेला दिसला की, लोकं त्याला लाथ मारतात, बाजूला करतात. 
पण, तोच दगड एखाद्या मूर्तिकाराने उचलून नेलं आणि त्याला आकार देऊन घडवलं तर त्याचा देव तयार होतो. 
आणि त्याच दगडापुढे लोकं नंतर झुकतात. हाथ जोडतात. अगदी माणसाचही तसंच असतं. 
जोपर्यंत तो घडत नाही लोकं त्याला पडलेला दगड समजतात आणि लाथ मारतात  आणि घडला की, पाय पडायला येतात. मागेमागे येतात.. प्रीत प्रीत

Shailesh Hindlekar

अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे ) श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात.  या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करता. मग गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात. तसेच अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात.  दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या गटारी #poem #nojotophoto

read more
 अंधकाराचा अंत व्हावा..ज्ञानाचा प्रकाश पसरावा.. आज दीप अमावस्या ( गटारी नव्हे )
श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. 
या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदील, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करता. मग गूळ घालून कणकेचे उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली धिंडे असे गोडधोड करून नैवेद्य दाखवतात. तसेच अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. 
दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या गटारी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
Tunnel 1)स्वतःला एवढं ही स्वस्त होऊ देऊ नका की, लोकं तुम्हाला सहज विकत घेऊ शकतील. 
2)इतकं ही साधे राहू नका की, लोकं तुमचा गैरफायदा घेतील. 
3)इतकी जास्त कुणाला वेळ देऊ नका की, लोकं तुम्हाला रिकामटेकडा समजायला लागतील. 
4)कुणाला इतकं जास्त प्रेम करू नका की, तुमचा पुन्हा दुसरं कुणीच नाही म्हणून तुमची कदर करणारं नाही. 
5)आणि इतकं स्वार्थी आणि मतलबी राहू नका की, लोकं तुमच्या मदतीला येणार नाही  
6)गरजेपुरतं पैसा आणि चारचौघात बसण्याइतकी इज्जत कमवा. 
7)सगळ्या गोष्टी सीमित ठेवा. कारण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक ठरतो. 
8)प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणून जगा. भरपूर आनंद घ्या. कारण, कुणालाच आपलं शेवट माहित नसतो.... (प्रीत )

अश्लेष माडे (प्रीत कवी )

निस्वार्थी आणि आनंदी जगा #Quote

read more
Safar हल्ली लोकं नात्यांपेक्षा पैशाला फार महत्व देतात. जे लोकं लहानपणी एका चॉकलेट चे दाताने दोन तुकडे करून प्रेमाने खायचे तेच बहीण भाऊ, बहिणी -बहिणी, भाऊ -भाऊ संपत्तीसाठी, पैश्यासाठी एकमेकांचे गळे कापत आहेत. कोर्टात एकमेकांविरुद्ध खटले दाखल करत आहेत. एकमेकांचे चेहरे बघायला नाक मुरडतात असे वैर निर्माण केलं आहे. कुठं गेलं ते बालपनिचे प्रेम, नात्यापेक्षा पैसा, संपत्ती इतका कसं काय महत्वाचं वाटतं लोकांना आज. मृत्यूनंतर सोबत काहीच नेणार नाही प्रेमळ आठवणींशिवाय हे ठाऊक असूनसुद्धा कसलं एवढं लोभ. मित्रांनो जीवन एकदाच मिळते ते आनंदाने जगा. चुका स्वीकारा, मोह सोडा, त्याग करा, नातं जपा, प्रेम करा, वैर भाव सोडा, कारण, नातं चिरकाल टिकते धन नाही. निस्वार्थी जगा आणि आनंदी जगा.. (प्रीत ) निस्वार्थी आणि आनंदी जगा

Rutuja Ghume

#लोकं बोलतात... खरंय लोक बोलतात आणि आपल्याला नेहमीच वाईट वाटतं, लोकं का बोलतात असले प्रश्न उदभवतात. चला तर मग आज या विषयावर लिहुया. #लोकंबोलतात #बोलतात

read more
 #लोकं बोलतात...
खरंय लोक बोलतात आणि आपल्याला नेहमीच वाईट वाटतं,
लोकं का बोलतात असले प्रश्न उदभवतात.
चला तर मग आज या विषयावर लिहुया.
#लोकंबोलतात #बोलतात


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile