Nojoto: Largest Storytelling Platform

Best साक्ष Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best साक्ष Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about साक्षी का अर्थ, साक्षात्कार का अर्थ, साक्षात्कार सवाल और जवाब, साक्षरता दिवस विश्व, साक्षरता दिवस,

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

साक्ष दोन्ही बाजूंची झाली
तरच न्याय होणे शक्य आहे
नाहीतर एका बाजूवर अन्यायच होणार #साक्ष #न्याय #अन्याय #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #yqtaai

Shankar Kamble

नभांगणी पुनवेचा 
         चांद शोभतो बिलोरी 
 लाट चुंबिते तटाला 
          प्रीत उसळे सागरी 

 मधु आलाप जुळूनी 
          योग साधला सुरम्य
 ओढ हूरहूर दाटे
         गूढ संवाद अगम्य

 दूध पिठोरी सांडले
         विखुरले भाव मोती
 सुख शयन त्यागुनी 
         मंद तेवतात ज्योती

 नेत्र कमळ उमले
       सूर व्याकूळ अधरी 
 कुंजवनी शीळ घुमे 
       देह फुलवी बासरी

 चित्तचोर काजव्यांची
        करू कोणाला कागाळी?
 सुख अवचित आले
        जशी सजली रांगोळी

 साक्ष देई कोण आता?
         झाला फितुर चांदवा
 तुझ्या पिरतीची नक्षी
        ओल्या हळदी गोंदवा

©Shankar Kamble #चांद #चंद्रमा #चंद्र #पौर्णिमा #प्रेम #हळद #गोंदण #साक्ष #“प्रेम” 

#parent

Akanksha Kelkar

साक्ष चंद्राची

मनाने मनाशी 
       एकरूप व्हावे
नकळत तुझे
       नाव ओठी यावे 

तुझ्यासवे वाटे
       चांदराती फिरावे
शीतलशा चांदण्यात
        धुंद होऊन जावे 

नजरेत तुझ्या
      मला मीच दिसावे
मिलनास आपुल्या
      चंद्राने साक्षी व्हावे
        
                     ...... आकांक्षा केळकर

©Akanksha Kelkar #प्रेम #कविता #साक्ष #चंद्राची

#moonlight

शेवटचं पान

#साक्ष 💕💕

read more
कधी सायंकाळच्या सूर्यास्ताच्या किनाऱ्याला आपली भेट व्हावी,

तुझी माझी कहाणी येणाऱ्या चांदण्या रात्रीची साक्ष व्हावी..

- शेवटचं पान #साक्ष 💕💕


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile