Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माझा देश निबंध मराठी, माझा आवडता संत निबंध, माझा आवडता संत, माझा आवडता छंद, माझा आवडता खेळ निबंध,

  • 10 Followers
  • 13 Stories
    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#माझा श्रीहरी सावळा....
त्या तिथं पैलतीरी देव विठुराया माझा अलिकडे एकला मी
टाळ मृदंगाचाचाले हा नाद अन् गजर वारकरी हे ओव्या अभंगही गाती
अंगी केवढा तयाचीया हा उत्साह पाऊल घेता ते सदा पुढती पुढती
कर कटेवरी तरी वाहतोस अवघ्या विश्वाची काळजी
वंदनास येती लहान थोर सारे मिळून
दुःख दैन्य भेदवाभ तेधवा जाती सारे गळून
आळवती तुझे गीत परमसोहळा भक्तीचा पाहती भरून डोळा
तु माझी माऊली माझ्या अस्तित्वास लाभलेली कृपावंत सावली
येई हारसाल तुझ्या दर्शनास मी मनी ठेवूनीया भाव भोळा
तुच हृदयाचा जागर माझ्या तुच माझा श्रीहरी सावळा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझा_श्रीहरी_सावळा

शब्दवेडा किशोर

#माझा नसलेला हक्क....
काल हसत हसत तु म्हणालास की माझ्यासकट सगळं तुझंच आहे राणी...
सगळं तुझंच आहे असं म्हणालास खरंच सांग ना रे तु....कुठे काय आहे रे माझं......?
कपाळीचं कुंकू मोठ छान कोरून लावते मी नाव तुझंच आहे त्यावर गोंदवलेललं
या आपल्या घर संसारात मेहंदीने भरलेलं पहिलं पाऊल टाकताना व उंबरठ्यावर ओलांडता माप 
नाव तुझंच होतं माझ्या ओठांवरच्या उखाण्यात गुंफलेलं ते अनमोल असं अस्तित्वही तुझंच होतं माझ्या अस्तित्वाशी जोडलेलं....अन् तू म्हणतोस सगळं तुझंच आहे..खरंच सांग ना रे तु....कुठं काय आहे रे माझं......?
सावली बनून तुझी चालताना पावलोपावली सप्तपदी आठवत गळ्यातल्या मंगळसूत्राचा एकेक मणी मजला सदा तुझीच मनमोहक आठवण करून देणारा हो....तुझ्या माझ्या अस्तित्वाला एक करणारा आहेच तो....मंगळसूत्राच्या पहिल्या वाटीतलं कुंकू भाळावर मिरवताना एक झालेला तोच जीव माझा राया तुझ्यातच गुंतलेला मग कुठे काय दिसे रे माझं उरलेलं
अन् तू म्हणतोस सगळं तुझंच आहे खरंच सांग ना रे तु....कुठं काय आहे रे माझं......?
हातभर ल्यायलेली हिरवीगार काकण किणकिणतात व 
माझ्या स्पंदनातून नाव तुझंच उमटत जातं प्रत्येक श्वासासोबत
हो..मी अन् माझं बालपण अन् सोबत बांधून आणलेली ती किंचितशी लावलेली हळद मात्र माझीच हं..
नावाची तुझ्याच होती रे ती..पण जाताना मात्र मीच अंगभर लेवून जाईन एकटी..जोडव्यांची ती अखंड जोडणी सोबत नेताना त्या चिमूटभर हळदीचा तिच्यावरचा माझा हक्कही मी नाही सोडणार..ती माझ्या अस्तित्वाचा भाग असणार..ती तेवढी चिमुटभर हळद..केवळ माझीच..हो..फक्त माझीच असणार..
फिरूनी नव्यानं जन्म घेईन मी तेव्हा सुद्धा तीच तुझ्या नावाची चिमुटभर हळद मी मोठ्या अभिमानानं अंगभर लावणार..तेव्हा सुद्धा ती चिमुटभर हळद तुझ्याच नावाची असणार रे..आणि तरीही काल हसत हसत तु म्हणालास की माझ्यासकट
सगळं तुझंच आहे राणी...सगळं तुझंच आहे असं म्हणालास..
खरंच सांग ना रे तु..कुठं काय आहे रे माझं......?
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #स्त्री_जन्मा_तुझी_कहाणी

शब्दवेडा किशोर

#माझा सखा श्रीकृष्ण
@शब्दवेडा किशोर
पाहीले नाही राधेनं कधीच श्रीकृष्णाचं विराट रूप
नाही बघितला तिने विश्वंभर द्वारकाधीश
अन् नाही बघितले द्वारकेतले सुख
नाही अनुभवलं तिने राजवैभव अन् क्वचितच होते
तिच्या नजरेत हे वैभवरूपी श्रीकृष्णाचं मुख
तिने फक्त आपल्या सख्यावर निरपेक्ष प्रेम केले
तिने फक्त आपल्या मनमोहनासोबतचे सौख्य अनुभवले
राधेच्या मनीचे निर्मळ प्रेम श्रीकृष्णानं हेरले होते
म्हणून स्वतःच्या नावाआधी तिचे नाव जोडून
"राधा-कृष्ण" म्हटले जाईल असे अमरत्वाचे वरदान तिजला दिले होते
श्रीकृष्णाची रूक्मिणी व राधेच्या आयुष्यातील
ही दोन्ही रूपं परस्पराविरोधाभासी आगळीवेगळी अशी भासे
एका बाजूला राधेच्या आयुष्यातला शांत सुकुमार श्रीकृष्ण तर
दुसऱ्या बाजूला रूक्मिणीसोबत कणखरतेनं राज्य चालवतानाही
हाच श्रीकृष्ण आपणास दिसे
हीच दोन रूप राधारूक्मिणीच्या नशिबी आली अन्
दोघींनीही ही रूपं वेगवेगळ्या रीतीनं अनुभवली
एकदा अनाहुतपणे या राधा रूक्मिणीची भेट श्रीकृष्ण
आपल्या लीलेनं घडवी तेव्हा एकमेकींना बघुन
त्यांच्या मनीची अवस्था काय वर्णावी
राधेच्या सुंदर नयनातुनच रूक्मिणी साऱ्या
गोकुळभर नांदलेला श्रीकृष्ण अनुभवत होती
अन् तिने लावलेल्या अत्तरातुनही दही - लोण्याचा सुगंध घेत होती
रूक्मिणीलाही बघण्यात राधा पुरती गुंगली
रूक्मिणीच्या रूपतेजातुन झळकणारे द्वारकेच्या वैभवाचे सुख
बघत जणु ती श्रीकृष्णाच्या तिने न पाहिलेल्या रूपात दंगली
दोघींच्याही कणाकणात लपलेला साठलेला नंदकुमार
श्रीकृष्ण हे बघत होता अन् दोघींचीही एकमेकींशी भेट होऊन
स्वतः न अनुभवलेला श्रीकृष्ण तोच श्रीपती जगाला दाखवत होता
हेच अभिनव श्रीकृष्णाचे मनोहरी ते रूपलावण्य
जेव्हा जेव्हा मी बघतो तेव्हा तेव्हा माझा आत्मा
लीन होऊनी श्रीकृष्णातंच होई धन्य 
देई मज सदा आत्मबल तो सखा श्रीकृष्ण
राही हृदयी सदा माझा प्राण बनुनी तो माझा सखा श्रीकृष्ण 
सौख्याचे स्वरूप मज हरवेळी दावतो तो माझा सखा श्रीकृष्ण 
हरूनी माझे दुःख दैन्य देई मज सौख्यता समृद्धता तो माझा सखा श्रीकृष्ण 
राही सदा माझी सावली बनुनी तो माझा सखा श्रीकृष्ण
असे सदा मजसोबत माझे अस्तित्व बनुनी तो माझा सखा श्रीकृष्ण

©शब्दवेडा किशोर #माझा_सखा_श्रीकृष्ण

Monika jayesh Shah

#माझा- ससुराल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 माझा ससुराल अन! नंतर माझा गांव! तुझे अन माझे! नाते जुलले असे! प्रेमाचा सराव असा उमडला माझावर, #कविता

read more
mute video

Sujata Darekar

नमस्कार मित्रानों.🙏 सुप्रभात. काल राष्ट्रीय शेतकरी दिवस होता. दिवस-रात्र कष्ट करणार्या बळीराजाला माझे कोटी कोटी वंदन. चला तर मग आजचा विषय आहे माझा अन्नदाता. मस्त मस्त रचना येऊ द्या. #माझाअन्नदाता हे टँग करायला विसरु नका. #शेतकरी

read more
दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस 
वेळ काळ नसतेच त्यास ठाव
रात्र सरता नि दिस ऊजाडता
कोरभर भाकरीचा त्यास भाव

ठिगळं फाटल्या मातीचे करी
हृदयास चिरांचे खोलवर घाव
कधी कधी बाप धीर गाळितो
पाहूनी क्रूर हा नियतीचा डाव

आभाळासी येता ओल हर्षतो
सरसरते अवचीत नयनी धाव
कुदाळ, पावडं, बीज, बियाणे
या स्नेह्यांनी फुलते त्याचे गाव

सकळांचे कष्ट सुफळी होवोत
जोडूनी करा वंदितो विश्वभाव
कुरवाळीत वात्सल्ये शेतमळा
धन्य धन्यतो अंतःकरणी श्राव नमस्कार मित्रानों.🙏
सुप्रभात.
काल राष्ट्रीय शेतकरी दिवस होता.
दिवस-रात्र कष्ट करणार्या बळीराजाला माझे कोटी कोटी वंदन.
चला तर मग आजचा विषय आहे
माझा अन्नदाता.
मस्त मस्त रचना येऊ द्या.
#माझाअन्नदाता हे टँग करायला विसरु नका. #शेतकरी

pooja d

सख्या,एकच प्रश्न विचारते
मदिराचा नशा जास्त
की माझा ?? #नशा #माझा #सहजच_सुचलेले

somnath gawade

#माझा मी रक्षक

read more
#माझा मी रक्षक!

 काल मध्यरात्री
कोरोना स्वप्नात आला.
दबक्या पावलाने जवळ
येतच होता तेवढ्यात त्याला 
    तीन फूट अंतरावर 
राहण्याचा इशारा केला.
        
जवळच ठेवलेले मास्क
 तोंडाला लावून त्याला जरा 
 दमात घेत येण्याचं प्रयोजन विचारलं
  तर म्हणाला मी स्वतः आलोय  कुठे येथे
    मला आणलं गेलंय
   तुमच्याच लोकांनी परदेशातुन
     
     बरच काही बरळत होता
       पण मी काही घाबरलो नाही.
     बोलण्यात अडकवून त्याला
      त्याच्या पासून कसं दूर
     राहता येईल याचं गुपित
     त्याच्याकडून वदवून घेतलं
              
               त्यातलं सार तेवढं सांगतो
                प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे 
               करून पालन .
             अनावश्यक लोकसंपर्क टाळावा.
             घरातच राहून सुरक्षित घरच्यांना वेळ द्यावा.
             कोरोनाला देशातुन बाहेर घालवण्यासाठी
             प्रत्येकाने 'माझा मी रक्षक' हा संकल्प करावा. #माझा मी रक्षक

Dnyaneshwar Bagade

#बाप

माझा विठ्ठल माझ्या घरी,
ज्याने दाखवली ही पंढरी,
तोच माझा राम कृष्ण हरी...!


#मनातल.....

©Dnyaneshwar Bagade #बाप #माझा विठ्ठल #father's Love

Love Guru Raja

#माझा नवऱ्याची शेटटींग सान्वी

read more
mute video

Dr Sanjay Borude

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile