Nojoto: Largest Storytelling Platform

Best Gazalofshree Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Gazalofshree Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ajay singh ki gazal, ajay kumar ki gazal, ullah khan ki gazal, altaf raja ki gazal, ajay das ki gazal,

  • 3 Followers
  • 18 Stories

Sunny singh

#Gazalofshree #lovefoeever Farhan Shaikh ✔️ आजाद मुसाफ़िर CHOUDHARY HARDIN KUKNA POOJA UDESHI Sudha Tripathi

read more

Mohammad Bilal

Satyam Pardeshi

जीव संपवण्यासाठी पंख्याला दोरी बांधतच होतो की आठवलं,

बाबांचे खांदे खूप दुखले होते पंखे पुसून झाल्यावर.

#सत्यम Shree #Gazalofshree #mehfilekavish3

Satyam Pardeshi

शरीराच भांडवल करून पोटच्या गोळ्याचं उदर भरते, 
तीं एक आई असते तेव्हा तीं कुठे स्वतःची कदर करते. 

#सत्यम Shree #gazalofshree #mehfilekavish

Satyam Pardeshi

पुन्हा तुझा निरोप घ्यायची हिम्मत येईल माझ्यात जेव्हा,

तेव्हाची भेट नक्की करूयात आपण...

#सत्यम shree #Gazalofshree #mehfilekaavish3

Satyam Pardeshi

आजही फक्त जिवंत आहे, 
नेमकी त्याचीच खंत आहे. 

निखळले सोबतीचे सगळेच तारे, 
गर्वात अजुनी आसमंत आहे. 

किनारीच फक्त फेसाळतो दर्या, 
गर्भात तो हि किती शांत आहे.

न उलगडे कधी विरहाचे गूढ, 
दर्प तुझा हल्ली साऱ्यांत आहे.

का नेंहमीच चूक वाऱ्याची असावी, 
तो एकच तर स्पर्श शहाऱ्यात आहे.

कसे जुळावे धावत्या पावलांशी, 
आपले जगणे निवांत आहे.

खायला उठते रिकामे घर माझे, 
तुझी आठवण पसाऱ्यात आहे.

टाळतो हल्ली मी लिहिण्याचा मोह, 
तुझे अस्तित्व माझ्या गझलांत आहे.

#सत्यम Shree #Gazalofshree #mehfilekaavish3

Satyam Pardeshi

बस रुतबे से नही वो अपने वजुद से बडा होता है, 
एक घर बाप के कंधो पे खडा होता है. 

#सत्यम Shree #FathersDay #Gazalofshree #mehfilekaavish3

Satyam Pardeshi

पाऊस ओसरून गेल्यावर छतावरून खाली पडणाऱ्या, 

एक एक थेंबाचा आवाज ऐकत रात्र अंगावर काढणं काय असतं. 

हें दर पावसात केवळ देहाने भिजणाऱ्यांना कळणं अशक्य.

#सत्यम shree #gazalofshree #mehfilekavish

Satyam Pardeshi

बिलकुल जुबां उर्दू जैसी हैं वो, 
समझ आये न आये दिल मे उतर जाती हैं. 

#सत्यम Shree #Gazalofshree #mehfilekavish

Satyam Pardeshi

तू सांगितलंस तिथेच थांबलो ना, 
तू सांगशील तिथे वळेल मी.

चाळून बघ पुन्हा जुनी पुस्तके, 
तुला नेमका कळेल मी.

मान्य आधी कळलो होतो 
नंतर कळलो नाही.

मी हि होतो ओला लाकूड, 
बघ पुरा जळलो नाही. 

अर्ध्या जळल्या राखेला, 
तू हातात घेऊन बघ. 

दुसऱ्या दिवशी त्या मेहंदीला, 
काय रंग चढेल मग. 

शोधू नकोसं त्यात नाव माझं, 
आता मेहंदीत कसा दिसेल मी.

डोळे घट्ट मीटून स्मरशील जेव्हा, 
तुझ्या गाली अलगद पडेल मी. 

#सत्यम Shree #gazalofshree #mehfilekavish
loader
Home
Explore
Events
Notification
Profile