Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझीनजर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझीनजर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

Rushikesh

मुंबई- स्वप्नपूर्तीचे शहर #माझीमुंबई #माझीनजर #सहजसुचलेलं #story

read more
स्वप्नपूर्ती'चे शहर 
          
मुंबई हे एक खऱ्या अर्थाने बहुआयामी शहर आहे. प्रत्येकजण या शहराकडे वेगळ्या अर्थाने बघत असतो.एकीकडे एखाद्या ग्रामीण तरुणासाठी मुंबई म्हणजे एक श्रीमंत आणि समृद्ध शहर तर एखाद्या नवख्या अभिनेत्यासाठी मुंबई म्हणजे त्याचौ स्वप्नपूर्तीचे शहर; तर दुसरीकडे रस्त्यावर मोलमजुरी करणाऱ्यासाठी मुंबई म्हणजे त्याच्या दोन वेळच्या जेवनाचे साधन!भोगौलीकदृष्ट्या अतिशय छोटे असलेलं हे शहर भारतासारख्या प्रगतशील आणि जगातील महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशांच्या स्पर्धेतील एक देश असणाऱ्या भारताचे आर्थिक केंद्र आहे ही देखील वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.
            मुंबईची एक विशिष्ट शैली आहे,संस्कृती आहे ,जी संस्कृती प्रत्येकाचे स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि सर्व धर्मांचा सन्मान करायला शिकवते. लहान लहान सात बेटांच्या मधल्या समुद्रात मातीची भर घालून तयार झालेल्या या शहराचं मला नेहमीच कुतूहल वाटतं. कधीकधी वाटतं ही मुंबई खप निष्ठुर आहे, अगदी टिपिकली सांगायचं झालं तर "इथे फ्लॅटचे दार नेहमी बंद..." जो तो आपापल्या जगात मग्न असतो, इथे माणसाशी बोलायला माणसालाच वेळ नसतो. पण दुसरीकडे जेव्हा काही नैसगिर्क संकट ओढवते किंवा अतिरेकी हल्ल्यासारख्या दुर्दैवी घटना घडतात तेव्हा पूर्ण मुंबई जात,धर्म,पंथ विसरून एकत्र येते.अश्या संकटकाळी मुंबईच्या रस्त्यावरचा, रेल्वेच्या प्लेटफॉर्मवरचा प्रत्येक माणूस मुंबईकराला आपल्याच घरातला वाटतो. साधं पावसमुलीखाद्य ठिकाणी काही प्रवासी अडकले असतील तर तेथील स्थानिक लोक त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात म्हणजे जेवढे मोठे संकट तितक्याच मोठ्या ताकदीने मुंबईकर एकत्र येतात,त्यामुळेच कोणतेही संकट मुंबईला जास्त काळ थांबू शकत नाही आणि हेच कदाचित तीच सामर्थ्य आहे.
            कोणताही तरुण जेव्हा पहिल्यांदा या शहरात आपले नशीब आजमवायला येतो तेव्हा तो प्रथम येथील ग्लॅमरस जग, ही मायानगरी, इथली श्रीमती, समृध्दी बघून भारावून जातो आणि मग त्याच्यामध्येही हे वैभव आणि अशी जीवनशैली मिळवण्याची सुप्त इच्छा तयार होते आणि मग तोही स्वप्न पाहायला लागतो.ते स्वप्न पाहण्याची उर्मी आणि शक्ती या शहरानेच त्याला दिलेली असते आणि मग सुरू होतो स्वतःला या मायनगरीत आजमवण्याचा त्याचा प्रवास!. या प्रवासात त्या ध्येयाला गाठण्याच्या नादात तो स्वतः मुंबईचा वेग पकडायला लागतो आणि तो कधी लोकलच्या वेळेच्या काट्यावर पळणारा मुंबईकर होतो त्याच त्यालाच काळात नाही.मुंबईने नेहमीच इथे येणाऱ्या सर्वांना आसरा आणि हुरूप दिला आहे,पण असं म्हटलं जातं की इथे कष्टाचा कस लागतो आणि जो इथे तग धरून राहतो त्याला त्याचे ध्येय नक्कीच मिळते व तोदेखील मुंबईकर म्हणून सार्थ ठरतो!
           मुंबईलाही तिची स्वतःची काही आव्हाने आहेत.१९७० ते २००० च्या काळात जेव्हा मुंबई काहीश्या अस्थिर अवस्थेत होती त्या वेळी या मायानगरीवर अनेक गुन्हेगारांनी त्यांच्या वेगळ्या 'अर्था'ने राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण जशिजशी मुंबईला स्थिरता मिळत गेली तसतसा या गुन्हेगारांचा नायनाट करण्यात आला.मुंबईची आजची आव्हाने म्हणजे दिवसेंदिवस दुसऱ्या शहरांतून, राज्यांतून आपली उपजीविका साधण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे अफाट वाढणाऱ्या लोकसंख्येला सांभाळणे व समतोल साधून येणाऱ्या प्रत्येक हाताला काम देऊन त्याचे ध्येय त्याला मिळविणे देणे हे होय.
            अशा या मुंबईचं प्रत्येकालाच आकर्षण आहे मग तो गावाकडचा तरुण असो ,अभिनेता असो व राजनेता !. याच मायनागरीत राहणारा व मध्यमवर्गीय आयुष्य जगणारा पण खूप मोठी स्वप्न उराशी बाळगून असलेला मी, या मुंबईत माझा अर्थ शोधतो आहे! 
                               - ऋषिकेश वाघमारे. मुंबई- स्वप्नपूर्तीचे शहर
   #माझीमुंबई #माझीनजर #सहजसुचलेलं


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile