Find the Best amravatikar Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutmehkar to amravati distance, shelu bazar to amravati distance, washim to amravati distance, bhatkuli to amravati distance, daryapur to amravati distance,
काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
✨ अमरावती – माझं शहर, माझी ओळख ✨ अमरावतीच्या मातीला गंध आहे शौर्याचा खास, गल्ल्यागल्ल्यांत वाहतो इथं स्वाभिमानाचा श्वास, तुकडोजींचा संदेश घेऊन इथली धरती चालते, गाडगे महाराजांच्या संस्कारांत अमरावती शहर सारं बोलते… देवांनाही भावणारं स्वर्गापेक्षा सुंदर शहर अमरावती आहे, अंबा मातेचा मिळालेला माझ्या अमरावतीला वसा आहे, मेळघाटच्या वाघांनाही भावणारी माझी अमरावती आहे, विदर्भाचा अभिन्न अंग, अशी ही माझी अमरावती आहे... बडनेराच्या स्टेशनवर गाड्या चोवीस तास धावतात, माझ्या अमरावतीच्या आठवणी मनात कायम घुमतात, चिखलदऱ्याच्या डोंगरांत निसर्गाचं गोड गीत गातो, सतपुड्याच्या पायथ्याशी महादेवाचं शिवरात्रीला दर्शन घेतो… सेलूच्या वारीत टाळ, मृदूंगाचा नाद लहरतो, संतांच्या किर्तनात भक्तीचा गुलमोहर बहरतो, रात्रीचा स्ट्रीट व्ह्यू, बाईकवरचा गार वारा, मनातलं अमरावतीवरचं प्रेम जणू काळजाचा तारा… पलाश लाईनच्या गल्ल्यांमध्ये जगण्याची नशा दाटते, स्पर्धा परीक्षेच्या वळणावर मैत्रीचं सोनं दिवसागणिक वाढते, या शहराच्या रस्त्यांवर धुळीला देखील जान आहे, कारण इथला प्रत्येक दगड इतिहासाचा मान आहे… अमरावती फक्त नाव नाही, हा आत्म्याचा गाव आहे, प्रेम, जोश आणि सन्मानाचा इथं निखळ भाव आहे, ही माती आमची, हे सळसळतं रक्त तिच्या रंगात आहे, अमरावतीचा जयजयकार हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांत आहे... ©मयुर लवटे #citylife #amravatikar #Life #Love #Poetry #maharashtra #marathi
#citylife #amravatikar Life Love #Poetry #maharashtra #marathi
read moreEnglish | हिंदी | ਪੰਜਾਬੀ | मराठी | తెలుగు | বাংলা | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | தமிழ் | മലയാളം | اردو | ଓଡ଼ିଆ |
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited