Nojoto: Largest Storytelling Platform

Best ग्रंथावली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ग्रंथावली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Sandeep A More

#स्वच्छतादूत #मराठी कविता #ग्रंथावली काव्यरेषा #poem

read more
स्वच्छता दूत

काया झिजवतो दिन-रात तू मेहनतीला जोड तुझ्या उगवत्या सुर्यांचा घाम आहे,
दुर्गंधावर करूनी मात माखला जरी गाळाने तू तुझ्या कर्तव्यावर ठाम आहे.

व्यवस्थेने तुझ्याकडे पाहुन हसता हसता नाकारले तुला पंरतू या देशाचे तू नाक आहे,
श्वास मोकळा करन्या गल्ली बोळातून घरा-घरा तून विष्ठी नाल्यांची तू हाक आहे.

हिरव्या सुंदरतेने नटलेली शहरे तुझ्या आयुष्यातील न उलगडनारा राज आहे,
तुझ्याच कले ने या देशाने स्वच्छतेचा पांघरलेला हा शृंगार साज आहे.

तिन्ही ऋतू परिवारासाठी सोसतो झळा जनू तुला मिळाला श्राप आहे,
मेहनतीला या उपमा नाही
दुःख एवढेच की तुझ्या तान्हुल्याचा तू दुर्दैवी बाप आहे.

जगभर प्रदुषणानाचा हाहाकार माजवनाऱ्या मानवनिर्मित कपटी घाणीला फक्त तुझा धाक आहे,
अस्वच्छ परिसर,रस्ते,गटारी,शौचालये हाच तुझा परिवार अन तिथेच तुझी राख आहे.

जनाला वाटे तिथे गंम्मत तूझीच चालते फक्त हिंम्मत विषारी वायूचा जिथे घात आहे,
तरीही हिनवते तुला ही निर्दयी स्वार्थी  मानवी जात आहे.

कचऱ्यातील स्वप्न वेचन्यासाठी पहाटेला दारोदारी जावून  मानवाचा तू मानवी गजर बनला आहे,
या व्यवस्थेने तुला मानव नाही फक्त सफाई कामगार गणला आहे.

किळसवान्या नजरा भिरकत असतील तुझ्याकडे परंतू भारताचा या तू खरा सूत आहे,
लाथाडले तुला व्यवस्थेने पण तुच इथला खरा स्वच्छता दूत आहे.

-संदीप मोरे,
नाशिक #स्वच्छतादूत
#मराठी कविता
#ग्रंथावली काव्यरेषा

Sandeep A More

#उपभोगी काया #मराठी गझल #ग्रंथावली काव्यरेषा #poem

read more
*उपभोगी काया*

जन्म घेवुनी प्रश्न सुटला नाही उरला आहे,
हरवन्या ठाकली तुला जात उभी पुरूषाची.

माळुन गजरा चेहरा तिचा लाजरा भास आहे,
लयलूट सौंदर्याच़़ी करण्यासाठी जात उभी पुरूषाची.

कष्ट तुझे..मोल उगवत्या सुर्याचा घाम आहे,
नऊ महिन्याच्या यातना भिरकवनारी जात उभी पुरूषाची.

वेदना लोळवल्या अपवित्रेच्या उरी फक्त साज आहे,
हात घालुन माया फाडनारी जात उभी पुरूषाची.

श्वास शेवटचा मोजून दावनारी अबला नारी आहे,
मढ्यावर पुरषार्थ गाजवनारी जात उभी पुरूषाची.

-संदीप मोरे,अशोका फाउंडेशन,आशा ट्रेडर्स, नाशिक #उपभोगी काया
#मराठी गझल
#ग्रंथावली काव्यरेषा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile