Nojoto: Largest Storytelling Platform

Best भावनांचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भावनांचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about रंग भावनांचे, भावनांचे प्रकार, भावनेचे महत्व, भावनांचे मार्केटिंग, भावनांचे व्यवस्थापन,

  • 1 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

@Praju..

#भावनांचे विश्व ❤️feelingsfeelingsheart💘

read more
पसारा सहज मांडला जातो ,
पण आवरताना जीव घेतो....
@prajakta_phalake
मग तो घरातला असो नाही तर
 मनातला❤️....!
💯😢🤞
      "भावनांचे विश्व" ( प्राजक्त)




Quotes Creator #भावनांचे विश्व ❤️#feelings#feelingsheart💘

@Praju..

#Fire#Broken 💔heartbreak💔 #जाणिवा#भावनांचे विश्वजाणिवांचा वणवा🔥🔥

read more
कुणी आपल्याच जवळच्या लोकांनी आपल्याला वेळोवेळी दुःखी केले असेल  ,त्रास दिला असेल ना, तर त्यांना  न बोलता प्रामाणिकपणाने त्या दुःखाची ,त्या त्रासाची जाणीव करून द्या. कारण  न सांगता करून दिलेल्या जाणिवा भविष्याची वाटचाल ठरवतात म्हणून जाणीव करून देत असताना त्या लोकांविषयी कुठलाही नकारात्मक किंवा सकारात्मक विचार करू नका.वेळ आली की एक दिवस त्याला आपोआप जाणीव होईल की आपण पेटवलेला जाणिवांचा वणवा त्याच्या उज्वल भविष्याची क्रांतिज्योत होती...म्हणून कुणी कितीही आपल्याबद्दल नकारात्मक विचार करू द्या आपण मात्र शांत , संयमी आणि सकारात्मक पणे चालत रहा कारण हे जग आहे इथे हल्ली शांततेची आगच लवकर वणवा होते ....😌🔥

                                           ✍️  -प्राजक्ता फाळके #Fire#Broken 💔#heartbreak💔 #जाणिवा#भावनांचे विश्व#जाणिवांचा वणवा🔥🔥

@Praju..

I'm new in this platform..so if U like my posts..plzz like &follow me🤞🤗Hope #भावनांचे विश्व ❤️MissingSchoolDays🥺Memorable #goldendays #SchoolMemories #SchooL_daYs 🥺❤️😍 #Inspired

read more
" शाळेची आठवण "

अडगळीच्या खोलीमधलं दप्तर
आजही जेव्हा दिसतं ,
खरंच माझं मन पुन्हा बालक होऊन
बाकावरती जाऊन बसतं..!  
सकाळच्या प्रार्थनेचा शब्द न शब्द 
माझ्या कानामध्ये घुमतो ,
गोल करून डबा खायला
आठवणींचा मेळा जमतो..!
                                                                                 सगळ्या लाल खुणांनी 
                                                                                             गच्च आहे  भरलेली माझी वही ,
                                                                                     अपूर्णतेचा शेरा आणि सर
                                                                                      तुमची तेवढी शिल्लक सही...
रोजच्या माझ्या अगदी त्याच चुका
आणि हातावरचे तेच व्रण ,
वहीत घट्ट मिटून घेतलेत
मी आयुष्यातील ते कोवळे क्षण ..!
  या सगळ्या शिदोरीवरच 
सर,रोज जगते आहे
चुकलेच कधी तर तुमच्यासारखंच
स्वतःलाच रागावून बघते आहे...
                                               इवल्याशा या रोपट्याची 
                                           वाढ रोज करते आहे
                                                            हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
                                                   सवय आता गेली आहे..!
   चांगलं अक्षर आल्याशिवाय
आता माझा हात लिहू देत नाही,
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही..!
                                                                दोन बोट संस्कारांचा
                                                                          समास तेवढा सोडते आहे,
                                                                                 फळ्यावरच्या सुविचाराप्रमाणे 
                                                                              रोज माणसे जोडते आहे...
योग्य तिथे रेघ मारुन 
प्रत्येक मर्यादा ठरवलेली ,
हळव्या क्षणांची काही पाने 
ठळक अक्षरात गिरवलेली...!
                                                                                         तारखेस माझी पूर्ण आहे वही
                                                                                     फक्त एकदा पाहून जा..
                                                                                          दहा पैकी दहा मार्क आणि
                                                                                                 सर ! सही तेवढी देऊन जा...!
" भावनांचे विश्व " ( प्राजक्त )
#Inspired by another poem#My favorite I'm new in this platform..so if U like my posts..plzz like &follow me🤞🤗#Hope #भावनांचे विश्व ❤️#MissingSchoolDays🥺#Memorable #goldendays #SchoolMemories #SchooL_daYs 🥺❤️😍

@Praju..

काही दुःख अशी असतात की ती सांगाविशी वाटली तरी सागुंच शकत नाही..निशब्द😞🤐#भावना #भावनांचे विश्व #SAD feeling😔Mood off😔Bad Day😭

read more
" फरक "

"फरक"  त्यानांच पडतो ज्याच्यां आयुष्यात  त्यांची काळजी करणारे... फक्त आपणच असतो. ज्यांच्या आयुष्यात आपल्या व्यतिरिक्त अशी अनेक 'नवी -जुनी' लोकं असतात ,जी त्यांच्यासाठी आपल्यापेक्षाही जास्त जवळची अन् महत्त्वाची असतात ना , त्यांना आपल्या एकट्याच्या जाण्याने काहीच फरक पडत नाही.पण आपण आपल्या आयुष्यात त्यांना खूप महत्त्व देतो, अन् कधीतरी त्याच्यांकडुन हिच अपेक्षा असते..पण तसं नाही झालं तर आपल्याला त्रास होतो, तेव्हाच खुप वाईट वाटतं, आपण दुःखी होतो.. कारण आपल्याला जवळच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीचा फरक पडत असतो..पण त्यांच्याकडे अतिमहत्त्वाची  लोकं असतील तररर ...आपल्या दुःखाचा.. आपल्या असण्या- नसण्याचा समोरच्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही...! 

"भावनांचे विश्व"  ( प्राजक्त )
              
                      - प्राजक्ता फाळके काही दुःख अशी असतात की ती सांगाविशी वाटली तरी सागुंच शकत नाही..#निशब्द😞🤐#भावना #भावनांचे विश्व #Sad feeling😔#Mood off😔#Bad Day😭


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile