Nojoto: Largest Storytelling Platform

Best लेक Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लेक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लेकर आंखों में आंसू, लेके आंखों में आंसू, लेके पूजा की थाली, लेके अश्कों के धारे, लेके पहला पहला प्यार,

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#लेक माझी भाग्याची..
अशी कशी लेक देवा माझ्या पोटी घेते माझं नावसुद्धा ती इथेच ठेऊन जाते
पहिला घास देवा ती जेव्हा माझ्याकडून खाते
एक सुंदरसा अनुभव तिथं मला शिकवुन जाते
माझाच हात धरुन ती जेव्हा इवलसं ते पहिलं पाऊल टाकते
तेव्हा देखील नजर माझी क्षणभर तिच्या आभाळभर पावलांच्या ठशांवर अडखळते
माझ्याकडूनच ती जेव्हा पहिलं अक्षर शिकते
तेव्हा सुद्धा तीच नव्यानं मज जगाचे जुने ज्ञान नव्यानं देते
तिच्यासाठी सुद्धा मीही रात्र रात्र जागतो कुशीत माझ्या झोपण्यासाठी
कधीकधी तर ती गाल फुगवुन बसते
अशी कशी लेक देवा माझ्या पोटी जन्म घेते.......
मी आणलेला सोनसळी फ्रॉक घालून ती आनंदाने घरभर नाचते
माझ्या तिच्यासाठी आणलेल्या गोष्टींचं कौतुक जगभर मिरवते
असे कसे वेगळे हे तिचे माझे नाते एक दिवस तर अचानक ती
मोठी होऊन जाते,"बाबा , तूम्ही दमला का ?" असं हळूच मला विचारते
एवढंच नाही तर माझ्यासाठी कपडे चप्पल खाऊ घेऊन येते
नव्या जगातील नविन गोष्टी मलाच ती शिकवते
एक दिवस माझी हीच एवढुशी परी इतकी मोठी होते की
लग्नाच्या मंडपात आपल्या जोडीदारासोब सुखस्वप्नांची ती सप्तपदी घेते
तिच्या दूर जाण्याने कातर मी होतो तर
हळूच हसून मला ती एक वेळ कुशीत घेऊन बसते
कळत नाही मला देवा असे कसे होते
कधी जागा बदलून मग ती माझीच आई होते
अशी कशी लेक देवा माझ्या पोटी जन्म घेते........
देव म्हणाला ऐक जरा माझं सांगतो तुला मी आयुष्याचं गोड गुपीत तुझं
तुझे तिचे नाते विश्वाच्या ह्या साखळीची एक नाजुक साजुक अशी कडी असते
तुझ्या दारी फुलण्यासाठी मीच हे रोप तुजला दिलेले असते
सावली अन् सुगंधाशी तर तुझेच नाते असते
मग सांग बरं वाहत्या प्रवाहाला कुणी
मुठीत कधी का धरते ?
मार्ग आहे ज्याचा त्याचा त्याला पुढेच असते जायचे
तुझ्या अंगणातली धारा ही कुणासाठी तरी नंतर
जीवनदात्री होणार असते अन् वाहती राहण्यासाठीच
गंगा पुन्हा नव्यानं सागरास मिळते
म्हणून एक छानशी गोंडस खरीखुरी परी तुझ्या घरी जन्म घेते
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #लेक_माझी_भाग्याची

Monica Bora

mute video

Shankar kamble

ओळखीच्या खुणां साऱ्या
आज परक्या वाटल्या
ओल सरतां मायेची
भेगां मनांत दाटल्या।१।

घालमेल उंबऱ्याची
जीव झाला कासावीस
सोसवेना होरपळ
डोळां चातकाची आस।२।

शीळ पाखरांची कानी
श्रावणातला हिंदोळा
घुटमळ पानोपानी
गंध दरवळ वेल्हाळा।३।

सये तुटलं माहेर
लेकपणाला पारखी
माझं फाटलं आभाळ
ऊन-सावली सारखी।४।

कसा आवरू हुंदका
किती निरपावं पाणी
कोंब खुडता उमाळा
भळभळ दाटे मनी।५।

नको कोरडा दिखावा
वरवरचं बोलणं
अंग पोळलं उन्हांत
आता कुठलं शिंपण?।६।

©Shankar kamble #माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण 

#Childhood

pournima sadavarte

#लेक*(जाणीव अस्तित्वाची)* कविता

read more
लेक परकी नसते...
लेक सुखाची परिभाषा असते....।।
लेक मायेची साऊली असतें...
लेक घराची शान असतें...
लेक असते अपेक्षांची खाण..।।
लेक समुद्रासारखी असते
मन मोठे करूनच जगते....।।
लेक कधीच आपल्या बापावर ओझे नसते....
लेक-आई बापाच्या कष्टाची जाण राखते...।।
लेक फक्त पणती असली तरी,
दोन घरातील अंधार दुर करते.....।।
"लेक"-छोट्या छोट्या अपेक्षा का मारते?
लेक ही अगोदर एक स्त्री पण असते.....।
लेक अस्तित्वाची जाणीव राखते....
*"लेक"-कधीच परकी नसते....।।
लेक परिवाराची जोड राखते...
लेक आपुलकीची माया असते....
पण खरच ना -लेक ही मंदिराचा उंच कळस असते....।।"

©pournima sadavarte #लेक*(जाणीव अस्तित्वाची)*
कविता

Archana Deshpande-Pol

#लेक #poem

read more
लेक लाडकी गं माझी..
आज निघाली सासूरा..
दारी थांबते पाऊल,
उरी हुंदका गहिरा.

काळजाचा तुकडा तो,
कसा जपला लाडात,
माप ओलांडून आज,
जाई परक्या घरात..

माय बापाचं कौतुक,
डोळाकाठात सांडलं.
भरलेल्या काळजानं
प्रेम मिठीत कोंडलं..

लेक मायेचं अंगण..
गंध सासरी सांडतो.
ठेच लागता लेकीला,
बाप मनात रडतो.

लेक असावी मायेची,
तीच्यासाठी मोहरावे..
तीच्या हसण्याने पुन्हा, 
माझे अंगण फुलावे..

©अर्चू.. #लेक


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile