Nojoto: Largest Storytelling Platform

Best मुलगी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मुलगी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगर्भात मुलगा आहे की मुलगी, बहिणीची मुलगी in english, वर्गात एक मुलगी आली, मराठी मुलगी शायरी इंग्लिश, मुलगी आणि बाबा कविता,

  • 12 Followers
  • 12 Stories

अदनासा-

विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C-XtBEPqlFh/?igsh=NW5nYnd2Ymg1aXh6 #मराठी #मुलगी #मुलगा #अभ्यास #बहिण #भाऊ #शाळा #Instagram #Facebook #अदनासा विनोदी व्हिडिओ हसा आणि हसवा विनोदी फनी व्हिडीओज उन्हाळा जोक्स

read more

Pratik Patil Patu

चिऊताई..

देवाने पाठवलं चिऊला
जगाचा उद्धार करायला
चिऊ होती पोटात
तेव्हाच झाला घात!

चिऊ देवाचा अवतार
करायला जगाचा उद्धार
पृथ्वी वर ती आली, आणि
जन्मापूर्वीच मारली गेली!

येणार नाही देव
येणार फक्त चिऊ
कसे कळेना कोणास
चिऊ देवाचाच जीव!

चिऊ-ताई तुझ्यावीना
देश मोडका कना
माझी एक विनंती
जन्म घेऊ द्या ना तिला!

जरी घेतला जन्म 
 तरी, जगू द्या ना तिला!
गोड जगता-जगता
छान शिकू द्या ना तिला! चिऊताई...
#savegirlchild 
#मुलगी 
#स्त्रीभ्रूणहत्याथांबवा

Shankar kamble

ओळखीच्या खुणां साऱ्या
आज परक्या वाटल्या
ओल सरतां मायेची
भेगां मनांत दाटल्या।१।

घालमेल उंबऱ्याची
जीव झाला कासावीस
सोसवेना होरपळ
डोळां चातकाची आस।२।

शीळ पाखरांची कानी
श्रावणातला हिंदोळा
घुटमळ पानोपानी
गंध दरवळ वेल्हाळा।३।

सये तुटलं माहेर
लेकपणाला पारखी
माझं फाटलं आभाळ
ऊन-सावली सारखी।४।

कसा आवरू हुंदका
किती निरपावं पाणी
कोंब खुडता उमाळा
भळभळ दाटे मनी।५।

नको कोरडा दिखावा
वरवरचं बोलणं
अंग पोळलं उन्हांत
आता कुठलं शिंपण?।६।

©Shankar kamble #माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण 

#Childhood

Geetanjali Karande

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile