Nojoto: Largest Storytelling Platform

नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे द

नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता
 नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा

दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे
नयनातील रम्य दृष्टी तुझ्या नजरेने दिसू दे

देऊ दे हाक अंतःर्आत्म्याला ओ मात्र तू दे
आलेच काही अशुद्ध मनात दूर वाहून तू ने

दे चपराक अशी झापड उघडावी आळसाची
बहरावी अशी मती नवीनवेली पाने पळसाची

आचमन करुन भावनांचे भाव मनी झिरपू दे
जे जे चांगले ,उदात्त खिरापत तयांची वरपू दे

आज आत्ता आणि आत्ताच जगणे ध्यानी घेऊ दे
ओंजळ भरभरून सुखाची दुःखालाही कवटाळू दे

 नकोच रे काही काही चिंता नकोच कसला गुंता
भिडायला येऊ दे माणसाला माणुसकी न सोडता.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #fisherman नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता
 नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा

दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे
नयनातील रम्य दृष्टी तुझ्या नजरेने दिसू दे

देऊ दे हाक अंतःर्आत्म्याला ओ मात्र तू दे
आलेच काही अशुद्ध मनात दूर वाहून तू ने

#fisherman नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी तुझ्या नजरेने दिसू दे देऊ दे हाक अंतःर्आत्म्याला ओ मात्र तू दे आलेच काही अशुद्ध मनात दूर वाहून तू ने #शायरी

288 Views