Nojoto: Largest Storytelling Platform

आता मिटवून टाकू वाढलेला आपल्यातला दुरावा सांगण्या

 आता मिटवून टाकू
वाढलेला आपल्यातला दुरावा
सांगण्या जगास प्रीत आपली
हवा कशास कोणता पुरावा.?

नको तोडू तू पाकळ्या
फुलांच्या त्या गोड फुललेल्या
घे मुठीत त्याला हलकेच
प्रेमाविन तुझ्या त्या सुकलेल्या...

नको देऊ तू अंतर
चंद्रास त्या अमावस्येत लपलेल्या
येऊ देत पौर्णिमेस थांब तू
मिठीत धरेच्या त्या झोपलेल्या...

उल्हासित आहे मी
अलगद तुझ्या मिठीत येण्या
मिटवून सारे रुसवे फुगवे
नवप्रेमाने तुला जीवनात घेण्या...

येशील ना तू.?
अजुनही हाच प्रश्न आहे उरी
नको लावूस बघण्या वाट
तूच आहेस माझी प्रेयसी खरी...

©कविराज धनंजय
  #आता_मिटवून_टाकू 
#कविराज_धनंजय 
#walkingalone