Nojoto: Largest Storytelling Platform

ठरले होते माझे, एकट्याने चालणे, तू उगा सोबतीची गळ

ठरले होते माझे, एकट्याने चालणे,
तू उगा सोबतीची गळ घातलीस,
ऐन वसंताच्या मौसमात ही अशी,
बघ वटवृक्षाला पानगळ लागली।

दाखवून स्वप्नांचे मोकळे आभाळ,
तू उगी उगी समजूत घातलीस,
पानगळ लागता आता तू का ,
अशी गर्द राईत पाठ फिरवलीस।

हात धरलेला तुझ्या विश्वासाने,
तो हात आता पुन्हा हातात दे।
आयुष्यातली ही पानगळ जाऊनी,
पुन्हा बारमाही प्रेमवृक्ष बहरू दे। #yq_gns #पानगळ #बहर #वसंत #कविता #प्रेम
ठरले होते माझे, एकट्याने चालणे,
तू उगा सोबतीची गळ घातलीस,
ऐन वसंताच्या मौसमात ही अशी,
बघ वटवृक्षाला पानगळ लागली।

दाखवून स्वप्नांचे मोकळे आभाळ,
तू उगी उगी समजूत घातलीस,
पानगळ लागता आता तू का ,
अशी गर्द राईत पाठ फिरवलीस।

हात धरलेला तुझ्या विश्वासाने,
तो हात आता पुन्हा हातात दे।
आयुष्यातली ही पानगळ जाऊनी,
पुन्हा बारमाही प्रेमवृक्ष बहरू दे। #yq_gns #पानगळ #बहर #वसंत #कविता #प्रेम