Nojoto: Largest Storytelling Platform

जिथे कामापुरता संवाद सहवास आणि विश्वास असतो त्या न

जिथे कामापुरता संवाद सहवास आणि विश्वास असतो
त्या नात्याला मैत्री म्हणावं की नाही?

हिरवी पाने हिरवी वने
हिरवी होती सृष्टी जेव्हा
होती वाहत त्यातून खळखळ 
निर्मळ मैत्रीची सरिता

काळ बदलले ऋतू बदलले 
रूप बदलले सृष्टीचे
नाही हिरवी पाने वने, 
हिरवे नाही काही

आनंद गेला दाह झाला
भेगा पडल्या जमिनीला
क्षणात उडून गेले पाणी
सोडून निर्मळ नदीला

मागे उरले दगड गोटे
फक्त आठवणीला….

©Pratik Patil Patu
  मैत्री अशी असते का?
#friends #मैत्री 
#true #pratikpatilpatu

मैत्री अशी असते का? #friends #मैत्री #true #pratikpatilpatu #मराठीकविता

164 Views