Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्यातील कवी तुझा नेहमीच श्रोता आहे.. मी तर फक्त

माझ्यातील कवी 
तुझा नेहमीच श्रोता आहे..
मी तर फक्त नदी 
तू तर तो अफाट समुद्र आहे..

मी तुझा लेख 
अन् तू माझी कविता..
मी शब्द त्यातला
तर तू त्यातली सुंदरता..

ओळ मी गाण्याची 
तू सुर गाण्यातला..
मी वाद्य संगीताचा
तू ताल लय त्यातला..

मी किरण पाहटेचा
तू धरती नवरंगाची..
तुझे रूप दररोज पाहता
 ऊर्जा नवी तू सर्वांची..

तुझा कवी सचिन सदाशिव झंजे.

©Sachin Zanje
  #निसर्ग