Nojoto: Largest Storytelling Platform

White आजवर कोणत्या सावल्या लागल्या जिंदगीला उन्हाच

White आजवर कोणत्या सावल्या लागल्या
जिंदगीला उन्हाच्या.. झळा लागल्या

चाललो भार घेवून खांद्यावरी
पालखीला म्हणे ठोकरा लागल्या

जीवनाचे जरी चित्र दुःखामधे
चेहऱ्यावर छटा हासऱ्या लागल्या

जिंदगी आमची केस कोर्टातली
हाय श्वासागणिक हाजऱ्या लागल्या

शेवटी माणसा एवढे सत्य की
लाकडे लागली गोवऱ्या लागल्या

©Satish Deshmukh
  #rajdhani_night भर