#Nationalgirlchildday बाई जिद्द उंच उडण्याची तिच्यात ही आहे पण दृष्टीत समाजाच्या ती फक्त एक बाई आहे स्वप्ने बघून साकार करण्याची क्षमता तिच्यात ही आहे पण विचारात समाजाच्या ती फक्त एक बाई आहे अन्यायाला प्रतिकार करण्याची हिम्मत तिच्यात ही आहे पण कल्पनेत समाजाच्या ती फक्त एक बाई आहे ती आणि तिच्या भावना समाजाच्या नजरेआड आहेत कारण ती फक्त आणि फक्त एक बाई आहे सन्मानाने जगण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क तिचाही आहे कारण हातातलं खेळणं नसून ती सुध्दा एक बाई आहे ती सुध्दा एक बाई आहे रिबका पांढरे ©Rubi ❤️बाई❤️ #girlsquotes #girlsrighttostalkmen #girlrespect #girlseducation #girlsempowerment