Nojoto: Largest Storytelling Platform

असुनही खूप काही अजुन खुप काही हवय स्वतःच तर हवंच

 असुनही खूप काही
अजुन खुप काही हवय
स्वतःच तर हवंच आहे
दुसर्‍याचही त्यालाच हवय...

जे नक्किच लागतं 
त्याला ते कधीच नकोय
पैसा संपत्ती नाही गडे
मनशांती समाधान म्हणतोय...

स्वार्थाने भरलेलं मन
हाताने दान करू पाहतोय
दानशूराचा आणून आव 
मोठेपणात उगाच जगतोय... 

जगण्यासाठी सांगा बरे 
माणसाला अस काय लागतय 
ज्याला बघावं त्याला 
फक्त पैश्यासाठी धडपडतोय... 

नाही सर्वस्वी जगात पैसा
माणूस म्हणूनही जगावं लागतं
समजूनही सार्‍यास हे
खुपदा हेच त्यांना सांगावं लागतं...

माणूस म्हणून उरात जरा 
माणुसकीचं रक्त वहावं लागतं 
माणसाकडेही माणसाने 
कधी माणूस म्हणून पहावं लागतं...

©कविराज धनंजय
  #माणसाला_नेमकं_काय_हवंय
#कविराज_धनंजय 
#adventure