Nojoto: Largest Storytelling Platform

मागे वळून पाहिले असता ते जुने दिवस आजही आठवतात आठ

 मागे वळून पाहिले असता
ते जुने दिवस आजही आठवतात
आठवणीने जुन्या क्षणांच्या
मनासंगे डोळेही ओलावतात...

आठवतात अंगणातले
ते जुने सारेच खेळलेले खेळ
अजुनही तरळते ओठांवर
मित्रमैत्रिणींसोबत खाल्लेली भेळ...

किती सुरेख नि बरे होते 
ते जुने दिवस जगण्यातले 
दिसत होते प्रत्येकाचे 
चित्र सहज वागण्यातले... 

नव्हते काहीच कुणाकडे 
तरीही खूप काही होते सर्वांकडे 
हिरवळीसारखी माणुसकीही 
तेंव्हा मिळत होती जिकडे तिकडे... 

अजुनही वाटते प्रत्येकालाच 
यावे परत फिरून एकदा ते दिवस 
जगावे बालपण पुन्हा पुन्हा 
नक्किच असे होते ते जुने दिवस...

©Dhananjay
  #ते_जुने_दिवस...
#कविराज_धनंजय