Nojoto: Largest Storytelling Platform

जरा खंत वाटते ह्या झगमगत्या दुनियेत खरी खुरी कला ज

जरा खंत वाटते
ह्या झगमगत्या दुनियेत
खरी खुरी कला
जेव्हा मरून पडते ।।

सोशल मीडियावर आलेली
कविता हजारदा फिरवतो
पण, खरा कलावंत अजून ही 
कौतुकासाठी भुकेला असतो ।।

सिनेमातील आयटम सॉंग,ते उघडे नागडे 
लोक चेव आल्यागत बघतो
पण, पूर्ण अंग झाकलेली माझी लावणी
आजही आहे प्रेक्षकावाचून सुनी ।।

खरेदी करायला मॉल च आवडतो
कितीही चढे भाव असो, आपण देतो
पण, शेतकऱ्याकडे जाऊन
थोड्या पैश्यांसाठी घासाघीस करतो ।।

पोराने खूप शिकून मोठं व्हावं
म्हणून, आई बाप कष्ट करतात
अन, पोरग मोठं झाल्यावर
आई बापाला वृद्धाश्रमात धाडतात ।।

जरा खंत वाटते ओ
आताच्या स्थितीत खरं
कस टिकणार ?? का नेहमी
खोट्याचीच चलती राहणार ???
         -.......©✍️पूजा डोमाळे (राणू)





 #जरा #खंत #मराठीकविता #सत्यवचन #yqtaaimarathi
जरा खंत वाटते
ह्या झगमगत्या दुनियेत
खरी खुरी कला
जेव्हा मरून पडते ।।

सोशल मीडियावर आलेली
कविता हजारदा फिरवतो
पण, खरा कलावंत अजून ही 
कौतुकासाठी भुकेला असतो ।।

सिनेमातील आयटम सॉंग,ते उघडे नागडे 
लोक चेव आल्यागत बघतो
पण, पूर्ण अंग झाकलेली माझी लावणी
आजही आहे प्रेक्षकावाचून सुनी ।।

खरेदी करायला मॉल च आवडतो
कितीही चढे भाव असो, आपण देतो
पण, शेतकऱ्याकडे जाऊन
थोड्या पैश्यांसाठी घासाघीस करतो ।।

पोराने खूप शिकून मोठं व्हावं
म्हणून, आई बाप कष्ट करतात
अन, पोरग मोठं झाल्यावर
आई बापाला वृद्धाश्रमात धाडतात ।।

जरा खंत वाटते ओ
आताच्या स्थितीत खरं
कस टिकणार ?? का नेहमी
खोट्याचीच चलती राहणार ???
         -.......©✍️पूजा डोमाळे (राणू)





 #जरा #खंत #मराठीकविता #सत्यवचन #yqtaaimarathi