Nojoto: Largest Storytelling Platform

White मौन.. होता स्पष्ट आवाज माझा तरीही मी मौन नि

White मौन..

होता स्पष्ट आवाज माझा
तरीही मी मौन निवडले...
शब्दाने नाराज होतात
म्हणून मी शब्द सावरले...!

चांगल्या दुनियेत
विचित्र लोक सापडले...
बहस करण्यास काय अर्थ
म्हणून मी मौन निवडले...!

मी मौन झालो म्हणून
वाद त्यांच्यातच उठले ...
नाही करू शकत ते तडजोड
मौनावर चालवले खटले..!

नक्कीच जिंकेल मी
म्हणून युद्ध हे पेटले...
माझ्या मौनावर अनेक
आरोप अनेक घातले...!

प्रेमाने जग जिंकण्यास
अनेक हात धावले....
भांडणं,तंटा नकोच आता
म्हणून मी मौन निवडले..!

©Rahul Sontakke
  #Couple मौन #write #poem