Nojoto: Largest Storytelling Platform

लहरी निसर्गाच्या क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या रंगामु

लहरी निसर्गाच्या क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या रंगामुळे 
संपुर्ण भवितव्य तथा सुखायुष्याचा चेहरा सातत्याने काळानिळा होत असणाऱ्या शेतकऱ्यांना रंगपंचमीच्या रंगाचे अप्रूप काय वाटावे?? 
वर्षातील एकच दिवस 'बुरा ना मानो होली है.' म्हणून सुद्धा रंग लावल्याने चीड येणाऱ्या व्यवस्थेला प्रतिकाराची भीड न बाळगता निसर्ग शेतकऱ्यास राजरोस रंग फासून जातो ह्याचे दुःख कसे कळणार??

#अवकाळी आणि रंगपंचमी...!!

©शुभ पडघान
  #Colors