Nojoto: Largest Storytelling Platform

White ' मी ' मिळवले किती? भाव सारे मांडले मी माझ्

White ' मी ' मिळवले किती?

भाव सारे मांडले मी माझ्या कवितेमधूनी
सांग तुला शब्द वाचून अर्थ उमगले किती?
प्राण माझे ओतले मी प्रत्येक ओळीतूनी
सांग तुला श्वास माझे यमकात दिसले किती?

क्षणात विसरलास तू शब्द न् शब्द माझा
सांग आता मला, बघ प्रेम हे उरले किती?
तुझ्या आठवणींतून कधी घेतली न मी रजा
तुझ्या नजरेत आले किती? निसटले किती?

दुःख या कवितेतले पुन्हा मी स्मरणार नाही
पण यातही दुःख आहे हे तुला कळले किती?
प्रत्येक कवितेत तू, हे समजले मला ही
पण तुला जपताना सांग प्रेम मी मिळवले किती?

©Anagha Ukaskar #Moon #marathi #MarathiKavita #poem #Poetry
White ' मी ' मिळवले किती?

भाव सारे मांडले मी माझ्या कवितेमधूनी
सांग तुला शब्द वाचून अर्थ उमगले किती?
प्राण माझे ओतले मी प्रत्येक ओळीतूनी
सांग तुला श्वास माझे यमकात दिसले किती?

क्षणात विसरलास तू शब्द न् शब्द माझा
सांग आता मला, बघ प्रेम हे उरले किती?
तुझ्या आठवणींतून कधी घेतली न मी रजा
तुझ्या नजरेत आले किती? निसटले किती?

दुःख या कवितेतले पुन्हा मी स्मरणार नाही
पण यातही दुःख आहे हे तुला कळले किती?
प्रत्येक कवितेत तू, हे समजले मला ही
पण तुला जपताना सांग प्रेम मी मिळवले किती?

©Anagha Ukaskar #Moon #marathi #MarathiKavita #poem #Poetry