Nojoto: Largest Storytelling Platform

आज सौ. प्रियामॅम घोडके यांचा वाढदिवस ओळख साहित्य

आज सौ. प्रियामॅम घोडके यांचा वाढदिवस 

ओळख साहित्यातुन झाली
शब्दांनाच फुटली पालवी
स्नेह व आपुलकी ती वाटत फिरली
बोलणं तिचे लाघवी.!

अष्टपैलुत्व तिला साहित्यातुन लाभले
किती काव्यप्रकार तिने आम्हास शिकविले
लहानमुलांसारखे समजवुन सांगितले
धडे साहित्याचे तिने दिले..!

स्पर्श लेखणीचा 
सदा उपक्रमांद्वारे साहित्यातुन दिला
जिव्हाळा शब्दलेखणीतुनी 
सदैव दिसला..!

दोन वर्ष पाहता पाहता निघाले
बोलणे लडीवाळ, आदर मोठ्यांचा
ह्दय कसे रेशमी धाग्याने जुडले
आज वाढदिवशी पाऊस पडावा शुभेच्छांचा !

प्रियाताई ला वाढदिवसानिमित्त लेखणीतुन शुभेच्छा🍧🍫🍨
मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  #वाढदिवस