Find the Best वाढदिवस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआईचा वाढदिवस status, ७५ वा वाढदिवस कविता, वाढदिवस शुभेच्छा कविता, मुलाचा वाढदिवस कविता, बायकोचा वाढदिवस कविता,
Mohan Somalkar
मित्रवर्य दिलीप चौधरीचा वाढदिवस दि लाचा राजा दिलीप मैत्रीत ताचा गाजावाजा ली खाणातुन त्याला शुभेच्छा देतो. प रमेश्वर त्याला सुदृढ आयुष्य देवो. चौ पाटी वर बसुन मित्रांशी संवाद साधतो ध रोवर मनात स्नेहाची जपतो. री मझिम जीवनरुपी पावसात तो मनसोक्त गातो मित्रवर्य दिलीप हा आयुष्यात नेहमीच आनंदी असतो जीवनात आनंदी कसे रहावे. हे त्याच्यापासून शिकावे. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #वाढदिवस
Mohan Somalkar
प्रसन्नीत मुद्रा॥ सदा मुखी हास्य॥ काय करु भाष्य ॥ ताईवरी॥१॥ पहाट पूर्वेला ॥ सूर्योदय झाला॥ दिवस हो आला॥ सौख्याचा हा॥२॥ थबके रांगोळी॥ आठवल्या ओळी॥ लाऊ लाडीगोळी ॥ ताईपाशी॥ मंगल दिवस ॥ सुखाचा पाऊस॥ तो वाढदिवस ॥ आज आला ॥४॥ आरतीचे ताट॥ पाहु नका वाट॥ औक्षवाण लाट॥ येऊद्या ग॥५॥ ज्ञाना निशा मनी॥ अनघा अश्विनी॥ सुप्रिया ती रानी॥ सार्याजणी॥६॥ औक्षवाण करा॥ पेढा बर्फी चारा॥ सुखाचाच वारा॥ ताईघाला॥७॥ आली धावत ती ॥ रश्मीजी ही आली॥ भेट ती पहिली ॥ आज झाली॥८॥ सचिन कुमार॥ साहित्याचा हार॥ केकाचीच कार ॥ आणली रे॥९॥ निवडक परिवार व काव्यपुष्प समुह तर्फे ताईला शब्दरुपी वाढदिवसाच्या शुभेच्छा मोहन दादा सोमलकर व सौ.भारतीमोहन ©Mohan Somalkar #वाढदिवस
Mohan Somalkar
श्री. राजु धानुजी वलथरे वृक्षवल्ली वनचरे असा ठेवा जपणारा मैत्रीच्या मैफलीत वावरणारा मैत्रीचा तो आहे दुवा .! तो मित्र जाणवावा.! तो एक वकिल आहे न्यायाची बाजु मांडतो तो एक वन अधिकारी आहे वनाला जपतो जखम वन्यप्राण्यास झाली तो विवळतो झाडाचा प्राण त्याच्यात आहे तो वृक्षारोपण व जीवनदानाचा दरवर्षी कार्यक्रम राबवितो दादासाहेब पिता त्याचे त्यांच्या पावलावर पावले ठेऊन चालतो गरिबांना व गरजुना मदतीचा हात पुढे करतो.! आज वाढदिवसानिमित्त राजुभाला खुप खुप शुभेच्छा ©Mohan Somalkar #वाढदिवस
Mohan Somalkar
आज सौ. प्रियामॅम घोडके यांचा वाढदिवस ओळख साहित्यातुन झाली शब्दांनाच फुटली पालवी स्नेह व आपुलकी ती वाटत फिरली बोलणं तिचे लाघवी.! अष्टपैलुत्व तिला साहित्यातुन लाभले किती काव्यप्रकार तिने आम्हास शिकविले लहानमुलांसारखे समजवुन सांगितले धडे साहित्याचे तिने दिले..! स्पर्श लेखणीचा सदा उपक्रमांद्वारे साहित्यातुन दिला जिव्हाळा शब्दलेखणीतुनी सदैव दिसला..! दोन वर्ष पाहता पाहता निघाले बोलणे लडीवाळ, आदर मोठ्यांचा ह्दय कसे रेशमी धाग्याने जुडले आज वाढदिवशी पाऊस पडावा शुभेच्छांचा ! प्रियाताई ला वाढदिवसानिमित्त लेखणीतुन शुभेच्छा🍧🍫🍨 मोहन सोमलकर ©Mohan Somalkar #वाढदिवस
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited