Nojoto: Largest Storytelling Platform

बरसावं प्रश्नांनी एक-एक करून… शिस्थबद्ध विद्यार्थ्

बरसावं प्रश्नांनी एक-एक करून…
शिस्थबद्ध विद्यार्थ्यांसारखं एका line मध्ये यावं…
घाई नसावी, गडबड नसावी…
शांत, संथ जरी असले तरी पार 'आर-पार' जाऊन ढवळणारे असावे....
नाहीच जर त्यांची उत्तरे मिळाली तर मग 
पेटावं त्यांनी उत्तरांसाठी…
करावी आंदोलने,
करावी जाळपोळ,
करावे दंगे,
गचांडी धरावी
आणि नाकी नऊ आणावे उत्तरदायी इसमाला…
#त्याने जरी कलम १४४ लागू केला तर मग आता
घोळका करावा...
गर्दीने यावं…
बरसावं आता मुसळधार ढगफुटी प्रमाणे…
नामोहरम करून सोडावं…
एखाद्या वेड्या पिश्या प्रियकाराप्रमाणे पाठलाग करावा…
अन उध्वस्त करावं #त्याला-स्वतःला...
पण हे करताना प्रश्नांनी स्वतःलाच प्रश्न विचारावा
का..??
कश्यासाठी..?
कारण काय..??
अस्तित्व कश्याच..??
आणि बरेच….
कारण प्रश्नांना उत्तरे असतात आणि जर उत्तरेच नसतील ते प्रश्न नसतात...