Nojoto: Largest Storytelling Platform

Best त्याला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best त्याला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutत्याला meaning in english, त्याला जीवन ऐसे नाव, त्याला काय अर्थ आहे, आता त्याला, भोगले जे दुःख त्याला lyrics,

  • 31 Followers
  • 64 Stories

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

चेहरा

read more
प्रत्येकाच्या आयुष्यात असा  एकतरी, 
सुंदर आणि निरागस वाटणारा चेहरा असतो, 
ज्या चेहऱ्यावर त्याला प्रेम होतो, 
त्या चेहऱ्याशिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नाही.. 
उठता, बसता, झोपता तोच चेहरा नजरेत असतो. 
प्रीत चेहरा

राज श्री

read more
अळूवावरचं पाणी 
क्षणभर  त्याची जिंदगानी
किती लोभस रूप त्याचे
दिसतो जणू मोत्याचा मणी
त्याला न कसली नाती
कूणी न त्याच्या अवतिभोवति
पान हेच त्याचे विश्व 
देठाचा असे  त्याला आधार
स्वतः मध्येच  रमतो
आनंदाने नाचत बागडतो.
त्याला न भिती कशाची
मरण जरी त्याच्या  सामोरी
झुळूक येता वा - याची
विलिन होतो  मातीशी
मला  हि वाटतं व्हावं 
अळूवावरचं पाणी 
क्षणभंगूर का होईना 
पण मनसोक्त  जगावं.

राज श्री

पाऊस

read more
नको रे पावसा
असा अंगाला बिलगू
दूर माझा साजण
काय त्याला सांगू 
ओलिचिंब सर तुझी
अंगावर शहारती
भिजलेली काया माझी 
निशाणी तुझ्या प्रेमाची 
साजणाच्या आठवणी 
मनाला माझ्या छळती
जाऊन सांग त्याला 
ये लवखर परतूनी
अधिर तुझी सजणी
तुझीच वाट पाहती. पाऊस

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
रस्त्यावर दगड पडलेला दिसला की, लोकं त्याला लाथ मारतात, बाजूला करतात. 
पण, तोच दगड एखाद्या मूर्तिकाराने उचलून नेलं आणि त्याला आकार देऊन घडवलं तर त्याचा देव तयार होतो. 
आणि त्याच दगडापुढे लोकं नंतर झुकतात. हाथ जोडतात. अगदी माणसाचही तसंच असतं. 
जोपर्यंत तो घडत नाही लोकं त्याला पडलेला दगड समजतात आणि लाथ मारतात  आणि घडला की, पाय पडायला येतात. मागेमागे येतात.. प्रीत प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
कुणी जर तुमच्याशी रोज बोलत असेल. तुम्हाला त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हक्काने सांगत असेल. आणि अचानक त्यांनी तुमच्याशी बोलणं बंद केलं, तुम्हाला मॅसेज करणं बंद केलं असेल. तर, नक्कीच तुमचं काहीतरी चुकलं असेल. एकतर तुम्ही त्या व्यक्तीच्या बोलण्यावर दुर्लक्ष करत आहात, किंवा त्या व्यक्तीशी फक्त कामापुरते बोलता, तो तुमच्याशी वेळात वेळ काढून बोलतो मात्र तुम्ही त्याला वेळ नाही म्हणून टाळत आहात असं काहीतरी वाटत असते. खरं आहे एखादा व्यक्ती तुम्हाला महत्व देतो. तुमच्यावर प्रेम करतो. पण असं झाल्यावर त्या व्यक्तीला खूप दुःख होतो. त्याला खजील झाल्यासारखं वाटतं. आणि पुढे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून न बोलणं च योग्य समजते. कारण तुमच्याविषयी असलेलं आदर कमी कमी होत जाते. आणि आहे ते नातं न बोलण्यामुळे तुटण्याची वेळ येते. तेव्हा आहे ते नातं जपायचं प्रयत्न करा.. (प्रीत )

Meena

read more
प्रेम हे प्रेम असते
 हृदयात उमललेले फुल असते 
स्पंदनात त्याला जपायचे असते
 भावनांना साद देऊन श्वासात त्याला भरायचे असते
 प्रेम हे प्रेम असते
 नको त्याला ते जरूर होते 
सुंदर कल्पना ती जवळ येते
हव्या हव्या त्या गोड जगात घेऊन जाते
 नकळत घडणारी ती गोष्ट असते 
प्रेम हे प्रेम असते
प्रेमाची व्याख्या ती शब्दात असते
रुसवा फुगव्या ती कळते
एका  नजरेसाठी व्याकूळ झालेली  नजर ती असते
 त्याच्यासाठी आतुरलेले प्रेम असते
कधी सावरून घेणे ते असते
आयुष्यभर साथ देण्यासाठी थांबलेलं ते प्रेम असते 
प्रेम हे प्रेम असते,
त्या साठी प्रेमात पडावे लागले
गुलाबी ती उधळ अनुभवावी लागते
फुलोरा तो नजरेने फुलवायचा असतो
कधी जवळ राहून,तर कधी दूर राहून करावे लागते

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile