Nojoto: Largest Storytelling Platform

नको कोरडी माया तुमचे प्रेमही नको मजला पाहिले का क

 नको कोरडी माया
तुमचे प्रेमही नको मजला
पाहिले का कधी तुम्ही
डोळ्यात मांडव आसवांचा सजला...

उगा दाखविण्या जगा
नको असे माझे लाड पुरवणे
देऊन दुःख अमाप मजला
नको उगाच हे खोटे हसवणे...

महत्वाकांक्षा ठेवून उरी
आश्वासने खोटी कैकदा दिली
मारून टाकून ईच्छा आकांक्षा
जीवनाची या तुम्ही दशा केली...

नाही उरला विश्‍वास कसला
ना प्रेमही उरले आता तुमच्या वरती
संपले सारे आकाश माझे
ना उरली कुठे ही मजसाठी धरती...

हाक मज आता मरणाने दिली
सरणाने गोड आज मिठी मारली
सुटले सारे आता जग मला हे 
वाट मी आज त्या ढगांची धरली...

©कविराज धनंजय
  #नको_कोरडी_माया...
#कविराज_धनंजय