Nojoto: Largest Storytelling Platform

मी तुझी वाट पाहत आहे........ संध्याकाळच्या रुणझुणण

मी तुझी वाट पाहत आहे........
संध्याकाळच्या रुणझुणणार्‍या वार्‍यासोबत
भुरभरुतायेय केस चेहर्‍यावरून
त्यातूनच झिरपतोय
तिरकस संधिप्रकाश
आणि दिवस-रात्री दरम्यानच्या या विरामाची ही कातरवेळ
आजन्म वाट पाहत असल्याची हुरहुर
आणि आर्त वादळाच काहूर
अस्वस्थ होऊन वेगाने उसळतोय
आकुंचित होऊन मनाचा सागर
उजेड आणि अंधार मिसळतोय
ढळतीय दूरवर तेजाची लकेर
मग सगळं काही शांत होईल
या आभाळाला  शामल रंग चढेल
आणि शांतता नक्कीच येईल
पण आपल्या दोन शरीराला एकत्र बांधलेल्या
आणि एकमेकांना दिलेली नजर
याशिवाय मी शांततेची कल्पनाच करू शकत नाही.
आता तुझ्याशिवाय या अस्थीरतेला स्थैर्य नाही.
तू ये मी तुझी वाट पाहत आहे.


 वसु

©Vasundhara Jadhav
  # मी तुझी वाट पाहत आहे....

#वसुंधरा जाधव

# मी तुझी वाट पाहत आहे.... #वसुंधरा जाधव #मराठीकविता

170 Views