Nojoto: Largest Storytelling Platform

White माझ्या लेखणीत जादू असे सर्व सांगतात. प्रश्न

White माझ्या लेखणीत जादू असे सर्व सांगतात.
प्रश्न पडतो मला 'असे ते काय बरे पाहतात?'
तुम्हा आम्हा सर्वांचेच अनुभव सारखेच असतात. 
आणि या जगात कित्येक लेखक त्यांना गुंफतात. 
मग मी वेगळे असे नेमके काय लिहीत असेन ?
ज्यामुळे माझ्या कविता तुम्हाला आपल्याशा वाटतात?
बोलायची हिंमत नाही पण डायऱ्या माझ्या भरतात. 
विस्मरणीय असे क्षण कवितारुपी त्या साठवतात. 
त्यामुळे संवादाची मुळीच मला सवय नसली तरी
स्तुती, प्रशंसा या मला खरंच खूप आनंद देतात. 
पण कौतुकाचा जेव्हा मला देतील सारे हात 
तेव्हाही भिती असेल माझ्या मनात. 
या साऱ्यासाठी मी पात्र आहे का?
असे विचार सारखे येतंच राहतात. 
तरीही फक्त मनापासून लिहीत राहायचं 
कारण चांगल्या गोष्टींना दाद आवर्जून मिळतात.

©Anagha Ukaskar #Road #marathi #MarathiKavita #poem