Nojoto: Largest Storytelling Platform

पिहुचा वाढदिवस लेकीचा वाढदिवस! आजच्या दिवशी आ

पिहुचा वाढदिवस 
  लेकीचा वाढदिवस! 

आजच्या दिवशी आली 
लक्ष्मीची पाऊले घरी!
जन्मोत्सव झाला होता
घरात आनंद बहरला त्या प्रहरी!

पोटी मुलगी जन्माला येणे
भाग्याची गोष्ट समजतो!
कौतुक तिचे जन्मभर करुनी
लग्न तिचे करुनी परगृही धाडतो!

काळीज आपले ओवाळून 
मुलीला जीव सारे लावतात.!
काटा जरी तिच्या पायात रुतला
वेदना मायबापाला होतात.!

खुप मोठी व्हावी तू
शिक्षणाने व संस्काराने झेप घ्यावी!
यशाचे शिखर गाठून 
कुटूंबाची किर्ती मोठी करावी.!

मोहन सोमलक

©Mohan Somalkar
  #वाढदिवस