Nojoto: Largest Storytelling Platform

मदिरागृहातील दोन पेले मदिरागृहातील दोन पेले टेन्

मदिरागृहातील दोन पेले

मदिरागृहातील दोन पेले
 टेन्शन घेऊन खूप प्याले
दुःख एकमेकांना सांगून
शोक सागरात बुडून गेले

तळीरामांचे रोजचे किस्से
 ऐकून ऐकून बोअर झाले;
मदिरा स्वतःच रिचवून
बेवड्यांसारखे टल्ली झाले

दारूच्या पुरते आहारी जाऊन
तोंडाला येईल ते बरळू लागले;
मोडकी-तोडकी इंग्लिश झाडून
स्वतःचीच बढाई मारू लागले

 दोन पेल्यांची पिऊन पिऊन
एकमेकांत चांगली जुंपली;
गोष्ट हमरीतुमरीवर येऊन
दोघांची टाळकी फुटली

एकमेकांचा मार खाऊन
आता मात्र वाट लागली
नशेत इतरत्र भरकटून
घरची वाट हरवली

अडगळीतुन पकडून आणून
धुलाई होताच शुद्धीवर आले
जुने विसरून पुन्हा नव्याने 
तळीरामांच्या सेवेत हजर झाले











 #मदिरागृहातील दोन पेले
मदिरागृहातील दोन पेले

मदिरागृहातील दोन पेले
 टेन्शन घेऊन खूप प्याले
दुःख एकमेकांना सांगून
शोक सागरात बुडून गेले

तळीरामांचे रोजचे किस्से
 ऐकून ऐकून बोअर झाले;
मदिरा स्वतःच रिचवून
बेवड्यांसारखे टल्ली झाले

दारूच्या पुरते आहारी जाऊन
तोंडाला येईल ते बरळू लागले;
मोडकी-तोडकी इंग्लिश झाडून
स्वतःचीच बढाई मारू लागले

 दोन पेल्यांची पिऊन पिऊन
एकमेकांत चांगली जुंपली;
गोष्ट हमरीतुमरीवर येऊन
दोघांची टाळकी फुटली

एकमेकांचा मार खाऊन
आता मात्र वाट लागली
नशेत इतरत्र भरकटून
घरची वाट हरवली

अडगळीतुन पकडून आणून
धुलाई होताच शुद्धीवर आले
जुने विसरून पुन्हा नव्याने 
तळीरामांच्या सेवेत हजर झाले











 #मदिरागृहातील दोन पेले