Nojoto: Largest Storytelling Platform

त्या उंच डोंगराच्या पायथ्याशी वाहणार्‍या त्या सरि

 त्या उंच डोंगराच्या पायथ्याशी
वाहणार्‍या त्या सरितेच्या उशाशी
किती किती शोधले तुला
नसतानाही पंख उडालो आकाशी..!

होऊन दीनवाणा फिरत राहिलो
स्वप्नाच्या जगी तुला शोधत राहिलो
पापण्या आड झालीस तू
मात्र अजूनही तुलाच बघत राहिलो..!

आस होती माझ्या मनी
मिठीत तुझ्या बंद व्हावा हा श्‍वास
खोटीच ठरली तुझी वचने
अन् तोडलास तू माझा विश्‍वास...!

झोपडीत माझ्या एकटाच आता
मी आठवणी उराशी बांधुन आहे झोपतो
तू ये अथवा न ये सखे
तरीही तुझी मी इथे वाट आहे बघतो...!

उद्या मरेन जेंव्हा मी विरहाने
किमान अग्नी तरी देहाला तूच द्यावा
हीच ईच्छा शेवटची समजून
एकदा तरी मला तुझा स्पर्श तो व्हावा...!

अजुन काय मागणे तुला मागावे 
मिटलेले डोळे माझे डोळ्यांनी तू बघावे 
नाहीच भेटले जीवंतपणी प्रेम 
मेल्यावर तरी तू मला आपले समजावे..!

©कविराज धनंजय
  #किती_शोधले_तुला 
#कविराज_धनंजय 
#adventure