Nojoto: Largest Storytelling Platform
dipeshgulekar2858
  • 63Stories
  • 125Followers
  • 766Love
    127Views

Dipesh Gulekar

  • Popular
  • Latest
  • Video
03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

माझ्या सर्वात आवडीचा विषय म्हणजे "ती",
तिने Option ला टाकलेला विषय म्हणजे "मी"...

- अव्यक्त शब्द✍️













.

©Dipesh Gulekar #Books
03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

White तुला समजलोच नाही ग मी,
की तू मला समजूनच नाही घेतलंस... 

मान्य, की ओरडत होतो मी तुला,
तेव्हा माझ्या नजरेत का नाही पाहिलंस... 

मी करत असलेल्या काळजीत,
माझ्या डोळ्यातलं प्रेमच नाही बघितलंस... 

दिसला तो फक्त राग माझा,
त्याविषयी एकदाही का नाही विचारलंस... 

खरंच मी तुला समजलोच नाही,
की तू मला समजूनच नाही घेतलंस....! 

- अव्यक्त शब्द ✍️







.

©Dipesh Gulekar #good_night
03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

White .














हे कलियुग आहे इथे हेच होत 

इथे माणसांच्या भावनेपेक्षा 
whatsapp स्टेटस ला जास्त महत्व दिल जातं 

इथे माणसाच्या भेटीपेक्षा
व्हिडिओ कॉलिंग ला जास्त महत्व दिलं जातं 

इथे वैवाहिक जीवनापेक्षा
लिव्ह इन रिलेशनशिप ला जास्त महत्व दिल जातं 

इथे पवित्र मैत्रीपेक्षा
फसवणाऱ्या प्रेमाला जास्त महत्व दिल जातं 

इथे फॅमिली फोटोपेक्षा
घेतल्या जाणाऱ्या सेल्फी ला जास्त महत्व दिल जातं 

हे कलियुग इथे आणि इथे हेच होत... 

- अव्यक्त शब्द ✍️












.

©Dipesh Gulekar #Sad_Status
03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

White अव्यक्त सारा व्यक्त होणाऱ्या भावनांचा खेळ,
व्यक्त झाला अव्यक्त व्यक्ती पण चुकली ती वेळ...!

- अव्यक्त शब्द✍🏻











.

©Dipesh Gulekar #love_shayari
03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

White त्यांचा अचानक आलेला मेसेज मी पहिला,
तू दिपेश ना? असा प्रश्न त्यांनी मला विचारला...
चेहऱ्यावर स्मित हास्य देत एक होकार मी ही हुंकारला,
Hi ने सुरवात झालेला प्रवास आज आपलासा वाटू लागला...

रोज बोलता बोलता बोलण्यात गोडी वाढू लागली,
शब्दांत शब्द गुंफले माणसं आपलीसी वाटू लागली...
ओढ तुमच्या भेटीची एका क्षणात मजला झाली,
बघता बघता मिलनाची वेळ जवळ आली...

तसा उशीर थोडा मज कडूनच झाला,
वेळेच्या आधी येऊन त्यांनी माझाच रेकॉर्ड मोडला...
भेटीसाठी मी त्यांना पहिल्यांदाच कॉल केला,
तो गोड आवाज मनाला मंत्रमुग्ध करून गेला...

आता वेळ झाली की आपोआप मन वळू लागते,
न सांगताच मन माझे तुमच्या मेसेज बॉक्स मध्ये धावते...
मराठी-इंग्लिश ची जुगलबंदी ने बोलणे सुरू होते,
आपलेपणाच्या या बोलण्याने मन माझे आनंदाने डोलते...

कसं बोलू धन्यवाद तुम्हाला, कसे मानू आभार,
तुमच्या आपलेपणाच्या शब्दांनी, वाटतो मनाला आधार...


-Mr. Gulekar
०३/१०/२०२४









.

©Dipesh Gulekar #love_shayari
03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

White त्यांचा अचानक आलेला मेसेज मी पहिला,
तू दिपेश ना? असा प्रश्न त्यांनी मला विचारला...
चेहऱ्यावर स्मित हास्य देत एक होकार मी ही हुंकारला,
Hi ने सुरवात झालेला प्रवास आज आपलासा वाटू लागला...

रोज बोलता बोलता बोलण्यात गोडी वाढू लागली,
शब्दांत शब्द गुंफले माणसं आपलीसी वाटू लागली...
ओढ तुमच्या भेटीची एका क्षणात मजला झाली,
बघता बघता मिलनाची वेळ जवळ आली...

तसा उशीर थोडा मज कडूनच झाला,
वेळेच्या आधी येऊन त्यांनी माझाच रेकॉर्ड मोडला...
भेटीसाठी मी त्यांना पहिल्यांदाच कॉल केला,
तो गोड आवाज मनाला मंत्रमुग्ध करून गेला...

आता वेळ झाली की आपोआप मन वळू लागते,
न सांगताच मन माझे तुमच्या मेसेज बॉक्स मध्ये धावते...
मराठी-इंग्लिश ची जुगलबंदी ने बोलणे सुरू होते,
आपलेपणाच्या या बोलण्याने मन माझे आनंदाने डोलते...

कसं बोलू धन्यवाद तुम्हाला, कसे मानू आभार,
तुमच्या आपलेपणाच्या शब्दांनी, वाटतो मनाला आधार...


-Mr. Gulekar
०३/१०/२०२४



















.

©Dipesh Gulekar #love_shayari
03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

कधी कधी खुलाव लागतं,
पडत झडत उभ राहावं लागतं,
या सोनचाफ्या प्रमाणे दरवळावं लागतं...

प्रामाणिक मनाचं सुगंध देत,
भोवताल प्रसन्न ठेवावं लागतं,
या सोनचाफ्या प्रमाणे दरवळावं लागतं...

प्रेमळ फुंकर घालून अल्लद उमलाव लागतं,
अवचित कधी कधी मनसोक्त बहराव लागतं,
या सोनचाफ्या प्रमाणे दरवळावं लागतं...

सुगंध अंतरंगात विरघळत,
रुसलेल्या शब्दांना गोंजराव लागतं,
या सोनचाफ्या प्रमाणे कधी कधी दरवळावं लागतं...

#फुलराणी🪻
-RIध्दी✒️



.

©Dipesh Gulekar
03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

सह्याद्रीवरील रंग वेचीत
स्वप्न सोबती राहूदे
मीही त्या फुल-पाखरांसवे
झुलत झुलत जाऊदे

कवेत तुझ्या निजेन
फुलगंध मोजीत मग
तुझ्यासवे येईल तो गारवा
अन् जमतील सारे ढग

वेचित गंध,मिटून डोळे
हिरव्या रानी आली
सह्याद्रीच्या कुशीत ती
फुलराणी न्हाऊन गेली

#फुलराणी🪻
-Riद्धी✒️



.

©Dipesh Gulekar
03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

Girl quotes in Hindi ती स्वतंत्र आहे
पण खरंच...,
तिला स्वातंत्र्य आहे का?

ती कोणाची तरी बहीण आहे
पण खरंच...,
मुक्तपणे फिरणारी नारी आहे का?

तिचं अस्तित्व आहे म्हणतात 
पण खरंच...,
ते टिकून राहिलंय का?

अनेक जखमा झाल्या अंगावर
पण खरंच....
त्यावर न्याय मिळाला का?

नवे आकाश नवीन रंग उंच तिची भरारी
पण खरंच...,
विश्वात तिच्या न्यायानिती नांदू द्याल का?

मनगटात निर्भय ध्यास द्या
स्वातंत्र्याचे धडे द्या पण
पण खरंच...,
क्रूर संकटांना ठेचणारे हात ते कोणी दिले का???

-Riद्धी✒️




.

©Dipesh Gulekar
03613e4d9795a70d1b41f87bf16f5449

Dipesh Gulekar

White बालपणात होती मज्जा, मस्ती 
असंख्य इंद्रधनू रंग,
मनात यायच्या गोड आकांक्षा 
नवे गंध नवे छंद...

तारुण्यात गेला प्रवास आता
दडपण गणगोताचे,
चालता यशाची ही शिखरे
थकती पावले साऱ्यांचे...

तो धाक आईचा
आज वाटतो हवाहवासा,
स्वप्ने पूर्ण करण्या त्यांची नि माझी
गधं हरवला आपलेपणाचा...

सुख सोयींच्या गोष्टी साठी
न थांबला हा प्रवास,
कर्तव्याची ही वाट पाहता
जीव तुटतो आतो आत...

थांबल संपलं सारं काही
मन हे वेडे विखुरलेले,
नव्या जबाबदारीला सामोरे जात
बिघडत घडेल जीवन आपुले...

-Riद्धी✒️





.

©Dipesh Gulekar #sad_shayari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile