Nojoto: Largest Storytelling Platform
sandeepjadhavpat9825
  • 5Stories
  • 73Followers
  • 36Love
    52.7KViews

Sandeep Jadhav Patil

आठवनीचा कोंडमारा

  • Popular
  • Latest
  • Video
0acd8d7655f0ab772dafabb243522379

Sandeep Jadhav Patil

तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ...

तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ.
गुलाबापेक्षा कोंथीबीर दील्यावर ती समाधानी दीसते.
गुलाबा घेऊन गेलो तर ती गुलकंद आणायचा की असं म्हणते.
चाँकलेट देऊ की कीराणा घेऊन जाऊ कारण ती कीचनमध्येच रमते.
टेडीपेक्षा ती आमच्या बाळातच दीवसभर रमते.
त्या जीवंत टेडीच्या केलेल्या लाडानेच ती सुखावते.
प्रॉमिस तर साता जन्माचच केलय यापेक्षा आणखी कोणतं प्रॉमिस देऊ.
'ती'ला अग्नीच्या साक्षीन प्रपोज केलय यात आणखी जीवनभर आनंदाच प्रपोज करतोय.
हग तर रोजच करतो आज थोड अश्रुंच हग करुन बघु का.
काळजीवाहु कीस करुन थोडा आणखी धीर वाढवु का.
व्हँलेनटाईन डे तर मांडवात मित्रांच्या आप्तेष्टांच्या साक्षीनेच पार पडलाय.
आज पुन्हा त्याच आठवनीना ऊजाळा देऊ का
आता तुम्हीच सांगा .
तिला गुलाब देऊ का कोथींबीरची जुडी देऊ म्हणजे संसाराचा सुगंध फुलुन येईल.

©Sandeep Jadhav Patil
  #तीला_गुलाब_देऊ_का_कोथींबीरची_जुडी_देऊ
#आठवनीचा_कोंडमारा 
#मराठी_कविता
0acd8d7655f0ab772dafabb243522379

Sandeep Jadhav Patil

आम्हा लेखकांची जमातच वेगळी.....

दुसऱ्याचे दु:ख आपले समजुन शब्दाश्रु ढळायला लागतात.
दुसऱ्यांचा विरह आपला समजुन विरहात जायला लागतं.
आम्हा लेखकांची जमातच वेगळी.
दुसऱ्यांना झालेल प्रेम आपलच समजुन गुलाबी आठवनी डोळ्यात तरंगायला लागतात.
आम्हा लेखकांची जमातच वेगळी.
दुसऱ्यांना अन्याय आपला समजुन लढायला लागतात.
दुसऱ्यांचा आनंद आपला समजुन  आनंदी व्हायला लागतं. 
आम्हा लेखकांची जमातच वेगळी.
दुसऱ्यांचे कष्ट आपले समजुन व्यथा मांडायला लागतो
काय सांगाव आमच्या भावना.
तुमच्या दु:खाचे,सुखाचे,भावनेचे सोहळे कीतीतरी केले साजरे.
तरीपण आमची जमात बेदखलच का वाटते?
आमच असं काही नसतं सगळ तुमचच ओझ घेऊन जगतो.
तरी आम्ही दुर्लक्षीतच का आसतो....?
तरी आम्ही दुर्लक्षीतच का आसतो.....?

©Sandeep Jadhav Patil
  #आम्हा_लेखकांची_जमातच_वेगळी
#आठवनीचा_कोंडमारा_मराठी_कविता_संग्रह
0acd8d7655f0ab772dafabb243522379

Sandeep Jadhav Patil

जगासाठी अन्न पिकवनारी आमची जमात,कोणी ऊपाशीपोटी झोपु नये म्हणुन राबत आसते.
तुम्ही आम्हाला कीतपत महत्व देता याचा आम्ही विचार करत नाही.
जगातील प्रत्येक मानसाला रोज अन्न भेटावं यासाठी आमची जमात राबत आसते.
-आठवनीचा कोंडमारा
(मराठी कविता संग्रह)

जगासाठी अन्न पिकवनारी आमची जमात,कोणी ऊपाशीपोटी झोपु नये म्हणुन राबत आसते. तुम्ही आम्हाला कीतपत महत्व देता याचा आम्ही विचार करत नाही. जगातील प्रत्येक मानसाला रोज अन्न भेटावं यासाठी आमची जमात राबत आसते. -आठवनीचा कोंडमारा (मराठी कविता संग्रह) #मराठीसंस्कृति

0acd8d7655f0ab772dafabb243522379

Sandeep Jadhav Patil

आयुष्याच चांदण व्हाव.........
काळ्याकुट्ट रात्रीच्या अंधारात चांदणीच्या 
प्रकाशाच नांदण व्हाव.
आयुष्याच चांदण व्हाव.
आमावस्यापरी संकटाच पौर्णिमेच्या सुखात रूपांतर व्हाव.
आयुष्याच चांदण व्हाव.
कडाडणार्या विजेतुन पावसाच पाणी वाहत जाव.
आयुष्याच चांदण व्हाव.
सूर्यनारायणापरी तेजस्वी संसाराच सोन व्हाव.
आयुष्याच चांदण व्हाव.
चंद्राच्या साक्षीने चांदणीच्या साथीने.
सुखीक्षणांच्या भेटगाठीचा सोहळा थाटावा.
आयुष्याच चांदण व्हाव.
प्रेमाच्या वेलीवर विश्वासाच फूल उमलाव.
आयुष्याच चांदण व्हाव.
माणुसकीच्या वाटेवर माणसांच माणुसपण भेटाव.
आयुष्याच चांदण व्हाव.
कवि-संदीप जाधव पाटील
#आठवनीची_कोंडमारा
#मराठी_कविता_संग्रह

©Sandeep Jadhav Patil
  #आयुष्याच_चांदण_व्हाव
#आठवनीचा_कोंडमारा
#मराठी_कविता_संग्रह
#कवि_संदीप_जाधव_पाटील
0acd8d7655f0ab772dafabb243522379

Sandeep Jadhav Patil

चुकीच्या  निर्णयाला मुल्याचा मुलामा दीला की चुकलेल्या गोष्टी 
लपवायला सोप्या जातात...

©Sandeep Jadhav Patil
  #आठवनीचा_कोंडमारा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile