Nojoto: Largest Storytelling Platform
jayshreehatagale1544
  • 101Stories
  • 202Followers
  • 817Love
    15.6KViews

Jayshree Hatagale

कवयित्री/लेखिका

  • Popular
  • Latest
  • Video
14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

"ही वाट जाते कुठे???"

ही वाट जाते कुठे?????
जेव्हा विस्कळित होते आयुष्य 
प्रत्येक वळणावर....
तेव्हा धुंडाळाव्या लागतात
पुन्हा नव्या वाटा.....
आणि ह्या नवीन वाटा
आयुष्याला कुठे घेऊन जातात.......???
हाही तितकाच गहन प्रश्न...
तरीही जी वाट समोर दिसेल
त्या वाटेने मार्गस्थ व्हावच लागतं
या संघर्षमय जीवनात कधीच 
भविष्याचा अंदाज बांधता येत नाही
अंधारमय या आयुष्याच्या वाटेवर
जस जसा एखादा उजेडाचा कवडसा दिसेल
त्या कवडशाच्या आधाराने....
चाचपडत का होईना....
उजेडाच्या दिशेने मार्गक्रमण करणं
जणू काही क्रमप्राप्तच असतं...
कारण कुठेतरी एक उमेद
कायम असते मनात......
कारण वादळातून वाट शोधणं
हे मनानं पक्कं ठरवलेलं असतं....
मरण तर एक दिवस आहेच
परंतु संकटाच्या छाताडावर पाय ठेवून
जगण्याची मजा काही निराळीच असते
त्यामुळे या वाटा कुठेही जात असल्या तरी
त्यांना योग्य दिशेने वळवण्याचं कसब
हे आयुष्य बरोबर शिकवतं माणसाला
फक्त हिम्मत कधी हारायची नाही
प्रत्येक वाटेला एका निश्चित ध्येयापर्यंत
पोहोचवण्याची कला ही
प्रत्येक माणसात असते....
त्यामुळे गोंधळून न जाता
त्या वाटेवरून बिनधास्त
प्रस्थान करायचे.......
"मंजिल" तो यकीनन मिलेगी....🤗

©®-जयश्री हातागळे #solace 
#ही वाट जाते कुठे???
#जयश्री

#solace #ही वाट जाते कुठे??? #जयश्री #poem

8 Love

14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

#krishna_flute 
#आयुष्य✍️ 
#कविता

48 Views

14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

#krishna_flute 
#जात
#गझल
14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

"मन-तरंग"
उसळतात कधी लाटा मनात
आनंदाच्या तर कधी दुःखाच्या
बेभान वादळे घेरतात मनाला
कधी निराशेने तर कधी आशेने
मनाच्या या अवस्थेला अनुभवताना
उफाळून येतात कधी आनंद लहरी
कधी उदासिनता गाजवते अधिराज्य.
करपलेल्या त्या कोमल मनावर.
कधी उधाणलेला सागर.
तर कधी संथ नदी असते मन.
कधी शुन्यात हरवलेली नजर
तर कधी जागेपणीचे स्वप्न असते मन.
कधी अधीर, बेभान असते
तर कधी संयमी, सावधान असते
किती या कल्पना, संकल्पना मनाच्या.
किती हे भास, आभास मनाचे?
कधी सैरभैर, सुसाट वारा हे मन
तर कधी सरोवरातील 
निश्चल, शितल, सुंदर जल
कधी रंगीबेरंगी फुलपाखरु
तर कधी वाट चुकलेला वाटसरु
हे मन.
किती रंग-तरंग या मनाचे?
कधी उथळ तर कधी सखोल
कधी कल्पनांचे भांडार.
तर कधी विषन्न, उदास खिंडार
हे मन.
मनाच्या या सा-या अवस्थांमधे
जगता आलं पाहिजे.
प्रत्येक क्षणाला, जिंदादिलीने
उपभोगता आलं पाहिजे.
यालाच तर जीवन म्हणतात.
आशा- निराशा येतच राहणार
मनावर त्यांचा परिणाम होतच राहणार
यही तो रीत है.
हार के बाद ही जीत है!
©®- जयश्री हातागळे #darkness
14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

#lovebeat
14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

#lovebeat
14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

#lovebeat 
#

159 Views

14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

#lonely

383 Views

14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

पाऊलवाट​

ती पाऊलवाट...
तुझ्या हृदयापासून ...
माझ्या हृदयापर्यंत येणारी
तुला-मला एका अनोख्या
विश्वात नेणारी...
बरेच दिवस झाले
मी शोधतीये तीला
कळतच नाहीये
ती हरवली असेल कुठे?
पण हृदयावर कायम आहेत
ते सोनेरी ठसे....
हातात हात घेवून..
आपण सुरुवात जिथून केली
ती वाट अचानक अशी...
धूसर कशी झाली?...
किती अलिप्तता आता
आपल्या वागण्यामध्ये आली
ती अधिरता प्रेमातली...
कुठे नाहीशी झाली?...
अजूनही खिळून रहाते
नजर त्या वाटेवर....
मन तरंगत रहाते
ओसरलेल्या लाटेवर...
पुन्हा-पुन्हा त्या पाऊलखुणा
घेतात ठाव हृदयाचा
सांग ना, सापडेल का?w
तो भाव हृदयाचा...
उधानलेल्या मनाला
पुन्हा मिळेल का ती वाट?
परतून येईल का त्या वाटेने
ती भरतीची लाट...
सोबत असूनही...
फाटे, का त्या वाटेला?
पुन्हा एकदा ती पाऊलवाट 
तुझ्या-माझ्या पायात अडखळावी...
तोल जाताना पुन्हा-पुन्हा 
एकमेकांना आधार देताना
 जसे एकरुप तू-मी
तशी एकरुप ती वाट व्हावी... 
एका नव्या प्रवासाची
साक्षीदार ....

©®जयश्री हातागळे #life

8 Love

14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

ना जाने किस मोड पर आकर
थम गई है जिंदगी!
सोचा था क्या और क्या
बन गई है जिंदगी!

©® JayshreeHatagale #life

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile