Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5773388881
  • 145Stories
  • 97Followers
  • 943Love
    580Views

ज्ञानेश्वर मुसळे

लेखणी घेऊन कागदावर मनावरलं ओझं उतरवायचं, बसं एवढंच. follow on Instagram as @musale.dnyaneshwar follow on fbhttps://www.facebook.com/dnyaneshwar.musale.3

  • Popular
  • Latest
  • Video
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

White आई म्हणजे नितळ
पाण्याचा झरा
आई म्हणजे शांत वारा,
आई म्हणजे भाकर 
आई म्हणजे साखर.

आई म्हणजे 
पहाटेची काकडा आरती,
आई म्हणजे  
विठ्ठल रखुमाईची  मुर्ती.

आई म्हणजे मायेचा हात
आई म्हणजे गोड गुळाचा भात,
आई म्हणजे तुरीची झाप
आई म्हणजे पाठीवरती थाप.

आई म्हणजे घागर
आई म्हणजे मायेचा पाझर,
आई म्हणजे हिरवगार रानमाळ
आई म्हणजे आभाळ.

आई म्हणजे राऊळाचा कळस
आई म्हणजे वृंदावणातली तुळस,
आई म्हणजे शाळा
आई म्हणजे लळा.

आई म्हणजे ऋतु
आई म्हणजे आयुष्याचा सेतु,
आई म्हणजे साऱ्या चुकांना माप  
आई म्हणजे कधी आई तर कधी बाप.

©ज्ञानेश्वर मुसळे
  #Happy_Mother_Day
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

भरकटलेल्या वाटेत सावरण्यास आलीस,
हसता रुसता आयुष्य झालीस

©ज्ञानेश्वर मुसळे
  #Valentine
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

परसातली नाही चोरत कुणी आता फुले,
हळूहळू मोबाईल मध्ये हरवुन बसली 
बालपण मुले.

©ज्ञानेश्वर मुसळे #Childhood
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

आठवण तुझी एक लहर होती 

भेट तुझी एक सायंकाळची पहर होती.

©ज्ञानेश्वर मुसळे #love
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

ओढ लागली की वेडं होतं
आणि वेडं झालं की ओढ लागते.

©ज्ञानेश्वर मुसळे #Top
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

आज झोपेचा कहर झाला,
तुझ्या स्वप्नांचा बहर दाटुन आला.

©ज्ञानेश्वर मुसळे #Love 

#Moon
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

" आठवण तुझी अन माझी "

सांजवेळ येते पुन्हा पुन्हा,
आठवण येते पुन्हा पुन्हा

हळव्या साऱ्या जुन्या खुणा,
आठवण येते क्षणा क्षणा
कसे समजावू मी मना,
आठवण येते पुन्हा पुन्हा


अबोल लाटा धूसर वाटा,
शोधाव्या त्या पुन्हा छटा
सांगू कस मी कुणा,
आठवण येते पुन्हा पुन्हा


ओवून एक एक धागा,
न घेणार कुणी ती जागा
बोलावे तरी मी न कुणा,
आठवण येते पुन्हा पुन्हा


नकोच नुसता आठवांचा खेळ,
देशील का आता भेटीस थोडासा वेळ
समजावावे तरी आता किती मना ,
आठवण येते पुन्हा पुन्हा

तुच ये आता काढून वेळ,
घेऊन पुन्हा ती सांजवेळ
नजरेत साठल्या साऱ्या खुणा,
आठवण येते पुन्हा पुन्हा.

©ज्ञानेश्वर मुसळे #SunSet
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

माझ्या गावाक 
येते ती  लाल परी,

लई झ्याक नसली
पण आहे खरी,
येळ न चुकवता येते
घेऊन मला घरी 
हा तीच ती लालपरी,

 ती आली की 
गाव सार तिच्याशी बोलतं,
कारण तिलाच काळजी
समद्यांची
कुणाची साळा,
तर कुणाचं बाजार,
कुणाचा आजार, 
कुणाचं बाळंतपण तर कधी 
सुईन ही तीच व्हते,
गावकीत, भावकीत नाही
समद्यांच्या घरात 
ती जाते.
कधी सुनेला सासर
तर कधी,
ताईला माहेर,
गावाची ओळख तीच करून देते येशी बाहेर.

कधी तिनं 
हलगर्जीपणा नाही केला,
वरल्या आळीच्या पप्याचा
साखरपुडा तिच्यामुळत झाला,
ऊन ना पाऊस ती 
नुसती फिरते,
नाती समजतं नाही पण 
तरी
एका धाग्यात सारी जुळवुन धरते.

कधी खड्डे तर 
कधी पुर,
सारं काही ती सोसते,
कुणी जवळ येऊ अगर
न येवो 
ती मात्र हसताना दिसते,

आता बरचं दिस झालं 
ती गावक फिरकलीच नाही,
आज ही तिची वाट पाहात
माणसं स्टँड धरून बसतात,
ती येते म्हणुन तर गावात माणसं दिसतात.

मला ही जायचं घरी,
लवकर सुरू होना  ग तु लालपरी.

ज्ञानेश्वर

©ज्ञानेश्वर मुसळे #Lalpari
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

बाप सावली 
बाप माऊली

©ज्ञानेश्वर मुसळे #FathersDay
3c55bde06e547a20353a10ed51962b6b

ज्ञानेश्वर मुसळे

आई म्हणजे नितळ
पाण्याचा झरा
आई म्हणजे शांत वारा,
आई म्हणजे भाकर 
आई म्हणजे साखर.

आई म्हणजे 
पहाटेची काकडा आरती,
आई म्हणजे  
विठ्ठल रखुमाईची  मुर्ती.

आई म्हणजे मायेचा हात
आई म्हणजे गोड गुळाचा भात,
आई म्हणजे तुरीची झाप
आई म्हणजे पाठीवरती थाप.

आई म्हणजे घागर
आई म्हणजे मायेचा पाझर,
आई म्हणजे हिरवगार रानमाळ
आई म्हणजे आभाळ.

आई म्हणजे राऊळाचा कळस
आई म्हणजे वृंदावणातली तुळस,
आई म्हणजे शाळा
आई म्हणजे लळा.

आई म्हणजे ऋतु
आई म्हणजे आयुष्याचा सेतु,
आई म्हणजे साऱ्या चुकांना माप  
आई म्हणजे कधी आई तर कधी बाप.

ज्ञानेश्वर मुसळे

©ज्ञानेश्वर मुसळे #MothersDay2021
loader
Home
Explore
Events
Notification
Profile