Nojoto: Largest Storytelling Platform
rohitpawar9736
  • 3Stories
  • 14Followers
  • 24Love
    0Views

Rohit Pawar

  • Popular
  • Latest
  • Video
4adf27bfb477e17aa0724663250d4d9d

Rohit Pawar

Unsplash मी अजून हि उभा तिथे

तू येशील या क्षणाची वाट
मन माझे पाहत होते,
जिथे पाहिलं होत तुला,
मी अजून हि उभा तिथे

कसं सांगू तुला ती भेट वेगळी होती
अवखळ पोरी समान तू वावरत होती
पाहुनी तुला मन स्थिर झाले होते
जिथे पाहिलं होत तुला,
मी अजून हि उभा तिथे

येते आठवण तुझी
क्षणात भुलतो मी स्वतःला
माझा मीचं आता राहिलो कुठे
जिथे पाहिलं होत तुला,
मी अजून हि उभा तिथे

पहायचं आहे तुला, बोलायचं आहे तुझ्याशी
गोड आठवणी बनवाव्या सोबत तुझ्याशी
तू येशील का आज इथे
जिथे पाहिलं होत तुला,
मी अजून हि उभा तिथे

©Rohit Pawar मी अजूनही उभा तिथे

#Love #प्रेम #poem  मराठी कविता प्रेम

मी अजूनही उभा तिथे Love #प्रेम #poem मराठी कविता प्रेम #मराठीकविता

4adf27bfb477e17aa0724663250d4d9d

Rohit Pawar

White पाहिलं प्रेम

अचानक तुझ्या येण्याने
मी स्तब्ध उभा झालो होतो
नजर ही खिळली होती तुझ्यावर
मी तुलाच पाहत राहिलो होतो

तुझा सुंदर मुखडा पाहून
तू स्वप्नपरी दिसत होती
स्वप्नी जिला पाहिलं होत
खरंच आज ती अवतरली होती

नाजूक काया पाहून तुझी
मी भ्रमित झालो होतो
डोळ्यातली मधाळ नशा तुझ्या
मी नशेत धुंद होतो

पण खरंच हा भाव मनी वेगळा होतो
आकर्षण नाही, जीव तुझ्यावर जडला होता
नकळत झालेलं हे प्रेम पाहिलं
या प्रेमाचा वर्षाव माझ्यावरी पडला होता

रोहित पवार

©Rohit Pawar पहिलं प्रेम
#love_shayari #Love #poem #Marathipoem #कविता  मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम

पहिलं प्रेम #love_shayari Love #poem #Marathipoem #कविता मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम #मराठीकविता

4adf27bfb477e17aa0724663250d4d9d

Rohit Pawar

a-person-standing-on-a-beach-at-sunset अशांत मन

आज मन अशांत आहे
कोण जाणे काय होत आहे
ओठांवर हसू नाही
चेहऱ्यावर गंभीरता आहे
शब्द जरी ओठावर नसतील
झुकलेल्या नजरेत सर्व काही सारं आहे
सतत चिंता मनी, विश्वास स्वतः हरत आहे
मनसोक्त उडणारा पक्षी आज वादळात अडकला आहे
हसमुखं चेहरा आज मात्र निराश आहे 
कोण जाणे काय होत आहे
आज मन अशांत आहे

©Rohit Pawar अशांत मन...

 मराठी कविता

#alone #poem

अशांत मन... मराठी कविता #alone #poem #मराठीकविता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile