Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8586158032
  • 813Stories
  • 35.9KFollowers
  • 10.8KLove
    1.2LacViews

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कवितेच्या विश्वात रमणारा

www.instagram.com/prit_poet_ashlesh_made

  • Popular
  • Latest
  • Video
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मला साथ देशील ना आयुष्यभर 
की परक्या मुलासाठी नटशील 
की, तुझं आयुष्य माझ्या नावावर करण्यासाठी 
ठाम राहून सगळ्या जगाशी झटशील...

येणार तुला पाहुणे पाहायला 
ही वार्ता ऐकवून माझं हृदय फाडशील 
की, कोणत्याही परिस्थितीत मला मिळवण्यासाठी 
सगळ्यांसमोर ढसाढसा हात जोडून रडशील...

बघ शेवटी तुला काय हवंय 
माझ्याशी लग्न करून माझं प्रेम कमावशील 
की, दुसऱ्याच्या हातात हात देऊन 
माझं प्रेम अनं मलाही कायमचं गमावशील...

शिमग्याची बोंब दोन दिवस असेल म्हणून 
 सगळं बाजूला ठेवून हे नातं निभावशील?
की, नाहीच जमलं मला शेवटी तुझी होणं 
शेवटी असं म्हणत मला कायमचं गमावशील?....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस लव्ह स्टेटस

मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस लव्ह स्टेटस #मराठीप्रेम

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

फार महत्वाचं आहे माझ्यासाठी 
तुझं माझ्या आयुष्यात असणं 
तुझ्यासोबत असताना आवडतं मला 
तुझं हसणं तुझं रुसणं तुझं लाजणं...

फार काही अपेक्षा नाहीत मला तुझ्याकडून 
काहीही झालं तरी हवंय फक्त तुझं असणं 
तू नसलीस जर आयुष्यात माझ्या 
तर नेहमीच खात राहील मला तुझं नसणं...

तू आहेस तर सगळं असल्यासारखं वाटतं 
तुला नाही माहित किती महत्वाचं आहे तुझं असणं 
तुझ्या असण्याने माझं आयुष्य पूर्ण आहे 
तू नसशील तर ते नेहमीच राहील अपूर्ण...

रुप अनं शरीर बघून नाही पडलो प्रेमात 
तुझं मन च आहे तसं प्रामाणिक अनं देखणं 
हसणं तर तुझं फार च आवडतं मला 
पण त्याहूनही आवडतं मला तुझं माझ्यापुढे हक्काने रुसणं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस

मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस #मराठीप्रेम

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रेम असतंच समुद्रासारखं 
कुणाच्या नशिबी लाट 
तर कुणाच्या नशिबी काठ..
पण,
प्रेम हे प्रेमच असतं 
आपलं चांगलं झालं तर मस्त 
आणि बिघडलं तर सगळं आयुष्य उध्वस्त..
प्रेमात कुणी जातात सोबत 
लाटेसोबत वाहून 
तर 
कुणी बसतात काठावर थकलेले 
आपल्या प्रेमाची वाट पाहून...
पण,
प्रेम हे प्रेमच असतं 
कुणी राधा होऊन आठवणीत जाते राहून 
तर कुणी रुक्मिणी होऊन 
प्रेमात निघते न्हाऊन...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking  खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या लव्ह स्टेटस मन उनाड झालया

#Thinking खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या लव्ह स्टेटस मन उनाड झालया #मराठीप्रेम

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

जात-पात,श्रीमंत-गरीब, राग-लोभ,उच्च-नीच,गर्व-घृणा ,
पैसा, संपत्ती, नाव, पद, शरीर,सुंदरता, चांगलं, वाईट, तिरस्कार, विटाळ, परिवार, समाज, धर्म...
सारं काही इथपर्यंतच...
    नंतर उरते ती फक्त 'आठवण'...
म्हणून, अस्तित्वाच्या पलीकडे काहीच नाही.
माणूस सोबत आहे तोपर्यंत जपा त्याला, एकदा निघून गेल्यावर कुणीही परत येत नाही...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तुमच्या नात्याला बंधनात ठेवण्यापेक्षा 
मोकळं सोडा..
जर ते नातं टिकलं 
तर ते तुमचंच होतं.
आणि जर ते तुटलं 
तर ते तुमचं कधीच नव्हतं...

शंका आणि राग तिथेच व्यक्त करा 
             जिथे गरज असेल....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #hugday  मराठी प्रेम कविता संग्रह बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या शायरी मराठी प्रेम

#hugday मराठी प्रेम कविता संग्रह बेस्ट कपल स्टेटस फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता चारोळ्या शायरी मराठी प्रेम #मराठीप्रेम

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

ट्रक च्या धडकेत दोघांचा मृत्यू

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

वाघ/बिबट वन्यप्राण्यांचे अवयव विक्री करणारे आरोपी वनविभागाच्या ताब्यात

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या अपघातात बापलेकीचा जागीच मृत्यू

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

शरीरावर प्रेम करणाऱ्यांना 
मनाचं प्रेम कसं कळणार
नात्यात विश्वासघात करणाऱ्यांना 
हृदयावरचा घाव कसं कळणार...

नको ती बंधने लादली स्वतःवर 
प्रेमातली मोकळीक त्यांना कशी कळणार 
शरीरावर आकर्षित होणाऱ्यांना 
मनाचं चुंबकत्व कसं कळणार...

अडकले कायमचे कचाट्यात जे जातीधर्माच्या 
त्यांना माणुसकी काय कळणार 
ज्यांना माणुसकी च कळली नाही 
त्यांना प्रेम तरी कसं कळणार...?

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking  कविता मराठी प्रेम मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम कविता

#Thinking कविता मराठी प्रेम मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम कविता #मराठीप्रेम

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

बंधन तुला ही आहेत बंधन मला ही आहेत 
पण हे नातं असंच नेहमी राहावं आपल्यात 
तू तिथे झुरावं मी इकडे क्षणोक्षणी मरावं 
असं कधी व्हायला नको आपल्यात...

तोडून सारे बंधने मोकळी हो स्वतःसाठी 
माझं तुझं असं कधीच नको आपल्यात 
बंधन तुला ही आहेत बंधन मला ही आहेत 
पण लग्नाशिवाय कोणतंही बंधन नको आपल्यात...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #ramsita  बेस्ट कपल स्टेटस खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या मन उनाड झालया मराठी प्रेम संदेश

#ramsita बेस्ट कपल स्टेटस खर प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या मन उनाड झालया मराठी प्रेम संदेश #मराठीप्रेम

loader
Home
Explore
Events
Notification
Profile