Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8586158032
  • 639Stories
  • 30.1KFollowers
  • 8.4KLove
    1.2LacViews

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कवितेच्या विश्वात रमणारा

www.instagram.com/prit_poet_ashlesh_made

  • Popular
  • Latest
  • Video
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

बडा नशीबवाला होता हैं वह मर्द 
जिसे वफादार औरत मिलती हैं 
और बोहोत गुरुर होता हैं उस औरत पे 
जब वह उस मर्द का नशीब बदलती हैं
खुद तो पल पल बिखरती हैं फिर भी जब संभलती  हैं 
 ऐसी वफादार औरत हर किसीको नहीं मिलती हैं
मिलती हैं किसीको अगर किस्मत सें 
तो उसकी जिंदगी संवरती हैं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Tulips
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मला नाही फार अपेक्षा 
कुणी माझ्याबद्दल प्रेमानं काही लिहावं 
फक्त एवढीच अपेक्षा असते 
मी लिहिलेलं समोरच्याला कळावं..

मनात असलेलं सारं शब्दात मांडतो 
त्या शब्दांनी कवितेचं आकार घ्यावं 
आकार घेतलेल्या प्रेमाच्या कवितेत मात्र 
तिला माझ्यासोबत तिचंच चित्र दिसावं...

समजून घ्यावी तिने माझी प्रत्येक कविता 
आणि कवितेद्वारेच मलाही तिने प्रतिसाद द्यावं 
एवढं रुजावं माझं प्रेम तिच्या हृदयात 
की,प्रसाद रूपात तिने मला तेच प्रेम द्यावं...

ठरेल कधीतरी माझं लिहिणं सार्थक 
शेवटपर्यंत त्या लिहिण्याला तिने बळ द्यावं 
मी तर लिहितोच मनातलं सारं तिच्यासाठी 
पण तिनेही कधीतरी माझ्यासाठी असं काही लिहावं..

©अश्लेष माडे (प्रीत कवी )
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रयत्न त्यांच्यासाठीच करा 
 ज्यांना त्यांची कदर असेल 
कमीपणा त्यांच्यासाठीच घ्या 
  ज्यांना तुमच्याबद्दल आदर असेल..

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #SAD
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मी कायम तुलाच दोष देईन 
तुझा गुन्हा असेल तू एकही प्रयत्न न केल्याचं 
शेवटी खरं प्रेम केल्याचं फळ मिळेलच मला 
दुःख कोणाला असतं प्रेमात कुणी मेल्याचं...

ज्याचं जळतं त्यालाच कळतं ना
राग तर असेलच कोणावरतरी खरं प्रेम केल्याचं 
मी तर प्रयत्न केलं बरेच कायमचं आपलं करण्यासाठी 
पण दुःख तर असेलच प्रयत्न निष्फळ ठरल्याचं...

नशिबाला दोष नाही देणार मी कधी 
कारण,आपलं काम आहे नशीब घडवण्याचं 
देवाने तर एकत्र केलं आपल्याला आधीच 
पुढे काम आपलं असतं मिळालेलं नातं निभावण्याचं...

उगाच याला त्याला दोष देण्यात काय अर्थ 
फळ असेल आपणच प्रयत्न न करता हरल्याचं 
आणि स्वतःच्या भावनिक स्वार्थामुळे 
पच्छाताप होईल पुढे अर्ध्यातच प्रेमाचं हक्काचं हात सोडल्याचं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Couple
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

एकच जन्म मिळतो स्वतःसाठी जगायला 
पुढच्या जन्माचं भरवसा नाही मला 
तरीही मिळालंच जर पुनर्जन्म नशिबानं 
तर ह्या जन्मात सुटलेलं तेव्हा मिळेल का मला...

देवाला सांगेन फक्त माणूस बनवून पाठव 
ही जात-पात आवडत नाही मला 
तरीही जर मिळाली पुन्हा पुढच्या जन्मात जात
तर तुझ्याच जातीत जन्म दे म्हणेन मी त्याला...

जातीमुळे इथे फार भेदभाव केला जातो 
जातीपुढे इथे किंमतही नाही प्रेमाला 
देवाने पृथ्वीवर पाठवला फक्त माणूस
पण माणसाने महत्व दिलं फक्त जातीला...

लग्नाच्या गाठी वरून बांधून येतात म्हणतात 
मग प्रेमाच्या बहाण्याने कोणाला एकत्र आणतो कशाला 
माणूस त्या देवांचेही वचन विसरतो 
आणि प्रेमाला तोडून महत्व देतो पैसा आणि जातीला...

ज्यांना स्वतःपेक्षा पुढच्या जन्मावर जास्त विश्वास आहे 
सांगायचं आहे त्यांना हे मला 
हे शरीर हे जन्म एकदाच मिळतं इथे 
मृत्यू शिवाय शेवटचा पर्याय नाही ह्या देहाला...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

काही गोष्टींची सवय लावून घेणं फार चुकीचं असतं 
कारण, लागलेली सवय मोडायला फार अवघड जातं...
लागलेली सवय मोडता येईलही हळूहळू नाईलाजाने 
पण संपूर्ण आयुष्य आठवणीत काढणं फार कठीण जातं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #SAD
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

चेहऱ्याने सुंदर दिसणारी नको 
प्रेयसी मनाने सुंदर असणारी हवी 
मनात नको ते ओझं ठेवणारी नको 
प्रेयसी मन हलकं करणारी हवी...

कोणाच्या दडपणात प्रेम करणारी नको 
मोकळेपणाने प्रेमात जगणारी हवी 
सतत निराश करून दुखावणारी नको 
सोबत प्रत्येक क्षण भरभरून जगणारी हवी...

नुसतं स्वतःच्या आयुष्याचा विचार करणारी नको 
तर दोघांच्याही आयुष्याचा विचार करणारी हवी 
शेवटी नको ते वारंवार कारणे देणारी नको 
तर तिचा संपूर्ण वेळ माझ्यासोबत घालवणारी हवी...

भूतकाळ वर्तमान भविष्य लपवणारी नको 
मनातलं सारं काही खरं खरं बोलणारी हवी 
फक्त स्वतःच्या सुखाचा भावनेचा विचार करणारी नको 
माझ्या भावनेचा,अपेक्षेचा, इच्छेचा विचार करणारी हवी...

फक्त माझ्यासाठीच स्वतःचं मन मारणारी नको 
तर स्वतःचे आयुष्य आनंदाने भरभरून जगणारी हवी 
समोर गोड बोलून मागे दगा देणारी नको 
मरेपर्यंत एकनिष्ठ खरं प्रेम करणारी हवी....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #mask
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मलाही वाटतं असे क्षण सोबत जगावं 
रिमझिम पावसात तिच्यासोबत असावं 
मोकळ्या रस्त्याने सोबत चालताना 
मोकळेपणाने प्रेमाच्या गप्पा मारावं 
मनसोक्त पावसात दोघेही चिंब भिजावं 
घरी जाऊन तिच्या मांडीवर निसंकोच निजावं 
आयुष्य एकदाच मिळतं असंही 
म्हणून हे आयुष्य सोबत भरभरून आनंदी जगावं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #SAD
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

Long Distance नातं 

लांब असलेलं आपलं प्रेम 
नजरेसमोरून जात असताना,
डोळ्यासमोर असूनही मिठीत घेता येत नसताना,
आपल्याच गावात असूनही घरी घेऊन जाता येत नसताना,
जवळून जात असताना स्पर्श करता येत नसताना,
समोर असूनही नजरेत नजर टाकता येत नसताना,
दुरून फक्त पाहून जवळ प्रेमानं बसताही येत नसताना,
जीव जळतोय हो आपलं 
ती नजरेसमोरून न भेटता दूर जात असताना,
आणि पुढील भेट केव्हा होईल ती केव्हा माझ्या मिठीत येईल 
या आशेवर तिला Bye करत असताना...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #LongRoad
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

एका पुरुषाला स्त्री कडून इतकंच हवं असतं 
फक्त जे त्याला हवंय ते न सांगता तिला कळावं 
आणि त्याच्याही विचारांच्या पलीकडलं 
त्याच्या हक्काचं प्रेम त्याला न मागता मिळावं...
केली कधी जर परस्त्री च्या बाबतीत मस्करी त्याने तिच्याशी 
तर आतून मन तिचं धगधग जळावं 
आणि त्यावेळी बोलण्यातून तिच्या 
त्याला तिचं त्याच्यावर असलेलं खरं प्रेम कळावं...
अजून काय हवं असतं एका पुरुषाला 
फक्त त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम त्याच्यावर तिने करावं
आणि त्याने न सांगता ही सारं काही त्याच्या मनातलं तिला कळावं..

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #eidmubarak
loader
Home
Explore
Events
Notification
Profile