Nojoto: Largest Storytelling Platform
radheshyamrathod1249
  • 141Stories
  • 109Followers
  • 1.2KLove
    43.0KViews

radheshyam rathod

हम दर्द छुपाने के लिए लिखते है.....

  • Popular
  • Latest
  • Video
716acda4652a90cfd86d553208c3fbb6

radheshyam rathod

विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,
मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ...
मागणे अवेळीच मृत्यू याच्यात “अर्थ” नाही ,
तुझं मागतो मी भलं कसा यात माझाच “स्वार्थ” नाही...
नाही श्वासांना विसावा ,मन कधीच “शांत” नाही ,
तुझ्या आठवणींच्या वेदनांना कसलाच “अंत” नाही...
 रक्त डोळ्यातुनी वाहिले मी ,पत्र तुला लिहिण्याला शरीरात “रक्त” नाही,
तुझ्या आठवणींच्या सूर्याला का “सूर्यअस्त” नाही ...
तिच्या बागेतली फुल आम्ही कैक ते सितारे ,
जसे चंद्राचे चांदण्यावर इतकेसे “लक्ष” नाही ...
ती मागते मला रे माझ्या सत्यतेचा पुरावा ,
माझ्याच बाजूने माझीच “साक्ष” नाही ...
माझ्या या ओठांना तुझेच नाव पाठ ,
या बालिश पणाला कुठलेच “तर्क” नाही ...
गणित खूप सोपे ,एकतर्फी प्रेमाचे ,
एकतर्फी प्रेमात कुठलीच “शर्त” नाही ...
करशील विचार माझा ,तुही कुण्या काळी ,
आहे गोड कल्पना हि वास्तव “मात्र” नाही...
तुझ्या नावावर लढण्याला झाले शहर सारे सज्ज ,
माझ्या साठी लढणारा माझा एकही “मित्र” नाही ...
विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,
मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ...

©radheshyam rathod #thelunarcycle
716acda4652a90cfd86d553208c3fbb6

radheshyam rathod

विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,
मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ...
मागणे अवेळीच मृत्यू याच्यात “अर्थ” नाही ,
तुझं मागतो मी भलं कसा यात माझाच “स्वार्थ” नाही...
नाही श्वासांना विसावा ,मन कधीच “शांत” नाही ,
तुझ्या आठवणींच्या वेदनांना कसलाच “अंत” नाही...
 रक्त डोळ्यातुनी वाहिले मी ,पत्र तुला लिहिण्याला शरीरात “रक्त” नाही,
तुझ्या आठवणींच्या सूर्याला का “सूर्यअस्त” नाही ...
तिच्या बागेतली फुल आम्ही कैक ते सितारे ,
जसे चंद्राचे चांदण्यावर इतकेसे “लक्ष” नाही ...
ती मागते मला रे माझ्या सत्यतेचा पुरावा ,
माझ्याच बाजूने माझीच “साक्ष” नाही ...
माझ्या या ओठांना तुझेच नाव पाठ ,
या बालिश पणाला कुठलेच “तर्क” नाही ...
गणित खूप सोपे ,एकतर्फी प्रेमाचे ,
एकतर्फी प्रेमात कुठलीच “शर्त” नाही ...
करशील विचार माझा ,तुही कुण्या काळी ,
आहे गोड कल्पना हि वास्तव “मात्र” नाही...
तुझ्या नावावर लढण्याला झाले शहर सारे सज्ज ,
माझ्या साठी लढणारा माझा एकही “मित्र” नाही ...
विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,
मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ...

©radheshyam rathod #raindrops
716acda4652a90cfd86d553208c3fbb6

radheshyam rathod

संपत नसते नातं कुठलं असं दूर गेल्याने...
प्रेम कमी होत नसते असं ब्लॉक केल्याने...
काही प्रश्नाचे उत्तर तुम्हीच आम्हाला सांगावे...
कॉल तेवढे दूर मात्र विचार कसे हे थांबावे...
Dp दिसत नाही तुझा, तुला कसं पाहावं...
नं बघता तुला असं डोळ्यांनी कसं जगावं...
पोहचत नाही मॅसेज माझे भावनांना कसं पोहचवावं...
असं नाराज नाही पाहू शकत तुला, तुला कसं समजवावं...
ऐकून घेणा वेडे,अजुन कसं मी वागावं...
रमत नाही तुझवीन मन हे,
या मनाला कसं मी सांगावं..

फोन सारखं म्हणाला ही ब्लॉकचं ऑप्शन पाहिजे होतं...
रडवणाऱ्या आठवणींना तुझ्या उत्तर द्यायचं नव्हतं...
कॉल सारखं माझ्या, तुझ्या आठवणनींना आडवायला...
कशाला हवाय पसारा तो,
विनाकारण रडवायला...
स्वतःला तुझ्यापासून दूर नेलं असतं...
तुला काळजातून कायमच ब्लॉक केलं असतं...
तरी पुन्हा वळून येत मन का हे,
दूर कितीही नेल्याने...
प्रेम असो वा वेदना कमी होत नाहीत ब्लॉक केल्याने...

©radheshyam rathod #achievement
716acda4652a90cfd86d553208c3fbb6

radheshyam rathod

#puraniyaadein
716acda4652a90cfd86d553208c3fbb6

radheshyam rathod

#tears
716acda4652a90cfd86d553208c3fbb6

radheshyam rathod

आठवणी घालतात धुमाकूळ तुझ्या,
 मनाचं मैदान गाजून जाते...
 डोळे नावाच्या नदीने सार,
 चेहऱ्याची जमीन भिजून जाते...
 वाटतं ओरडून सांगावं जगाला,
 दुःख ओठांवर येऊन थिजून जाते...
 एक उमेद तेवती ठेवली आहे,
 झुळूक तुझ्या आठवणींची येऊन विजून जाते...
 कसं आवरा व डोळ्यातल्या  पाण्याला,
 अश्रूंवर अश्रू गाळत आहे...
 घेऊन वेदनेचे फुल ते,
 शब्दांच्या धाग्यात माळत आहे...
 होतात असंख्य वेदना तुला आठवल्याने,
 तरी रोज स्वतःला जाळत आहे..
 उचलत नाही मी चुकीची पाऊल कधी,
माझ्या हालचालींवर जबाबदाऱ्यांची पाळत आहे

©radheshyam rathod #Barsaat
716acda4652a90cfd86d553208c3fbb6

radheshyam rathod

देव मंदिरी मी वसवला,
सारे मंदिर पावन झाले...
स्थापिला मी तोच देव घरा,
त्याचे हाल का बरे झाले...
तिथे स्नान होत असे प्रताकाळी
इथे उजाडते महिन्यातून...
देह मासाचा वा दगडाचा देवं,
गेले गेलेऱे बाटून...
    तिथे रोज घडशी त्याची भेट,
भक्ताचं चाले येणं-जाणं...
अडलं निडलं तुझं जरका,
का तेव्हाच आलं त्यांच ध्यान...
                            त्याची मूर्ती झिजली जरिका,
                             एक फुलाला महाग नाही...
                            तुमची मूर्ती जुनी जाहली,
                                त्यासी घराला जागा नाही...
                            चार पुस्तकं वाचली,
                             शिकूनी शाना झाला...
                       पैसा होता -नवीन घेतला,
                 तुझ्या घरात जो देवं तुझ्यासाठी जुना झाला...
                      तुमची देवळी,लाकडाचा पसारा,
                  त्याच्यापाई देवघर झाला...
                 त्रिलोक्याचा स्वामी देवं,
                   तुमच्यापाई बेघर झाला...

©radheshyam rathod #titliyan
716acda4652a90cfd86d553208c3fbb6

radheshyam rathod

लोकशाही शब्द फक्त भाषणात म्हणवलंय...
या मूठभर भा***नी आम्हाला चु## बनवलंय...
राजकारण यांनी मातीत मिळवलाय...
काकांचा पक्ष इथे पुतण्याने पळवलाय...
पक्षप्रमुख राहिले आणि कार्यकर्ते पक्षावर दावा करतायेत...
युवकांच्या भरत्या राहिल्या आता पक्षांच्या भरत्या भारतायेत...
बाबांचे शब्द टाळून मुलगा कलंकाची बाता करतोय...
ज्यांची सावलीही पसंत नव्हती त्याला आज त्यांचा हात धरतोय...
पक्षांतर केल्याशिवाय ईडीचे मोर्चा अटळ झालाय...
पंजा,धनुष्यबाण,घड्याळ, सगळ्यांचा कमळ झालाय...
टरबुजाला फळांचा राजा करा, अशी मागणी उठतेय...
विकासाचे मुद्दे राहिलेत बाजूला, हिंदू मुसलमान पेटतेय...
कोण तो कागद घेऊन फिरायचा जेलमध्ये धाडायला...
पक्ष नसून "गंगा नदी" झाली पाप धुऊन काढायला...
नेत्यांचा बी रेट आता खोक्यांनी वाढलाय...
निष्ठा,नीतिमत्ता, स्वाभिमान सत्तेसाठी सार विकायला काढलाय...
आम्ही कार्यकर्ते बी येड्यावानी वेगळच करतोय... नाश्ता आणि पेट्रोल मिळतं म्हणून रॅलीतनी फिरतोय...
यांच्या पाई आम्ही नात्यातनी अबोला धरतोय...
झेंडा कसा लावलाय घरावर म्हणून चुलत्यासनी मारतोय...
आम्ही बी मग पलीकडच्याला जिंकावून काकासणी जळवलांय...
काकांचा पक्ष इथे पुतण्याने पळवलाय...
लोकशाही शब्द फक्त भाषणात म्हणवलंय...
या मूठभर भा***नी आम्हाला चु## बनवलंय...


$$राधेबाळ $$

©radheshyam rathod
716acda4652a90cfd86d553208c3fbb6

radheshyam rathod

कुणी अन्याया विरुद्ध लढायला शिकवलं...
कुणी अपसेट असल्यावर हसायला शिकवलं...
कुणी दुसर्यासाठी भिडायला शिकवलं...
कुणी योग्य त्या व्यक्तीसमोर झूकायला शिकवलं...
कुणी काटेरी रस्त्यावर चालायला शिकवलं....
कुणी भविष्याकडे पाहताना पाठीमागे पहायला शिकवलं...
कुणी योग्य वेळी काय वं किती बोलायला शिकवलं 😂😂😂
कुणी शांत आणि प्रेमळ राहायला शिकवलं...
कुणी चुकलंच समोरचा तर त्याला माफ करायला शिकवलं...
कुणी भांडायचं आणि उपदव्याप करायला शिकवलं...
कुणी माझी ताई, मी कुणाचा दादा सारे नाते मिरवले...
कुणी मला मग मैत्रीचे धडे गिरवले...
कुणी देता देता मग सर्वस्व द्यायला शिकवलं...
कुणी कुणातरी साठी बदलायला शिकवलं...

©radheshyam rathod #Gurupurnima
716acda4652a90cfd86d553208c3fbb6

radheshyam rathod

कुणी अन्याया विरुद्ध लढायला शिकवलं...
कुणी अपसेट असल्यावर हसायला शिकवलं...
कुणी दुसर्यासाठी भिडायला शिकवलं...
कुणी योग्य त्या व्यक्तीसमोर झूकायला शिकवलं...
कुणी काटेरी रस्त्यावर चालायला शिकवलं....
कुणी भविष्याकडे पाहताना पाठीमागे पहायला शिकवलं...
कुणी योग्य वेळी काय वं किती बोलायला शिकवलं 😂😂😂
कुणी शांत आणि प्रेमळ राहायला शिकवलं...
कुणी चुकलंच समोरचा तर त्याला माफ करायला शिकवलं...
कुणी भांडायचं आणि उपदव्याप करायला शिकवलं...
कुणी माझी ताई, मी कुणाचा दादा सारे नाते मिरवले...
कुणी मला मग मैत्रीचे धडे गिरवले...
कुणी देता देता मग सर्वस्व द्यायला शिकवलं...
कुणी कुणातरी साठी बदलायला शिकवलं...

©radheshyam rathod #Gurupurnima
loader
Home
Explore
Events
Notification
Profile