Nojoto: Largest Storytelling Platform
saumitrajoshi9179
  • 28Stories
  • 6Followers
  • 219Love
    180Views

Saumitra Joshi

©-saumitra...

  • Popular
  • Latest
  • Video
8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

दिसें तूच सखये आज |
हृदयीं तू एक वैदेही||
अशीच निरंतर राहो साथ|
या रामाची तूच नंदिनी||

पहा एकदा मागे वळूनी |
पुरेच झाले तुझे लाजणे ||
ऐक जानकी हाक एकदा|
उघडी अलगद तुझी लोचने||

©Saumitra Joshi
  #ramsita #sitaram
8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

चंद्रभागेतीरी | उभा पांडुरंग ||
दर्शन घ्यावे | डोळेभरून ||
ध्यान विठ्ठल | मुखीं विठ्ठल ||
स्मरतो तुजला | मानसपूजेतून ||

©Saumitra Joshi #Flower vitthal

#Flower vitthal

8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

ऐल एक कान्हा
पैल एक कान्हा
दोघांतुन वाहे
एक तीच राधा
@गुढ

©Saumitra Joshi
  #Riverbankblue
8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

ताऱ्यांच्या या गर्दीत
वाट तुझी पाहतो
नक्षत्रांच्या समूहात
हास्य तुझे शोधतो

@गुढ

©Saumitra Joshi #Stars
8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

दोन किनारे आपण दोघे
भेट अचानक होईल का बघ
श्वास असेच श्वासात गुंतले
नकळताच बघ झालो जिवलग

@गुढ

©Saumitra Joshi #seashore sea
8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

ती शय्या मखमालीची
राधेस टोचते आता,
का कान्हा वळला नाही 
यावेळी जाता जाता!

माझ्याहुन काय असावे
कान्हासी इतके प्रिय?
पाव्याला जागच नाही
सुर निजून गेले काय?

धूसरशी काळी छाया
मग पडली अंगावरती
ते कुरुक्षेत्र का नाचे
त्याच्या अन माझ्याभवती

तो तिथेच अडकुन पडला
पार्थाच्या मोहापायी
गीतेच्या जन्मापुढती
राधेची यादच नाही.

ती येते सौधावरती
मग थेट गवाक्षी जाते
ती भिरभिरते एकाकी
कान्ह्याची वाट पहाते.

@गुढ

©Saumitra Joshi #ती शय्या मखमालीची 
#DearKanha

#ती शय्या मखमालीची #DearKanha

8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

अपनी जिंदगी कीं खुशियों कीं चाबी
किसी इन्सान पर मत छोडना
नही तो उसके चले जाने के बाद
आपका सबकुछ छिन जायेगा...

©Saumitra Joshi quote's 

#Roses

quote's #Roses

8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

वेदना माझ्या मनाच्या,
काय सांगू मी कुणा?
सांगूनी हळवाच होतो,
का कळेना मी पुन्हा!

हरवतात शब्द तेव्हा,
हरवती त्या भावना!
वेदना माझ्या मनाच्या,
काय सांगू मी कुणा?

साचता डोळ्यात पाणी,
दाटती अंधार हीं!
सांगूनी काय सांगू,
का कळेना ते पुन्हा?

-मुक्तछंद

©Saumitra Joshi #freevarse...
#SAD
8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

तो चंद्रमा पहा रें
गगनात हासणारा
दुधात त्या डोकावून
हलकेच लाजणारा

©Saumitra Joshi #ColdMoon
8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

भेट आपली होताच येथे
अवचित थोडा काळ थांबतो 
घेता हात हातीं तू माझा
रंग प्रीतीचा गाली चढतो 

वाट किती रें अजून पाहू
मिलनास या मी तळमळते 
घडो एकदा ऐसी जादू
नकोच आता बंध कोणते

होऊ आपण एकरूप रें
नकोच दुरावा दोघांमध्ये
जन्माची सोबत आपुली
असेच लिहिले जन्मामध्ये
@गुढ

©Saumitra Joshi #standout
loader
Home
Explore
Events
Notification
Profile