Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7460706401
  • 38Stories
  • 41Followers
  • 324Love
    50Views

Mahesh Desale

अरे वेड्या जीवन पुन्हा नाही, म्हणून मझ भरभरून जगायचे आहे...! ह्या जगण्यावर भरभरून प्रेम करायचे आहे..!

  • Popular
  • Latest
  • Video
8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

एरवी भिजत असतो मी सैरभिर
पाऊस पडून गेल्यावर..
असते ना आठवण साठवण...!
जूने गाठोडे नवीन वळणावर उघडल्यावर

मनातल्या मनात गुपीत अन् खलबते
चालत असतात क्षण क्षणावर..
हळूच हसू येते गालातल्या गालात
जून्या आठवणीच्या हिंदोळ्यावर..

का कुठे सुकलेले गुलाब अन् उडून गेलेला गंध
अजुनही किमयागार वाटत असतो मनावर..
खरच खुप सुंदर असतात ते क्षण अन् क्षण
जे कोरून ठेवले जातात हृदयावर...!
- महेश
09.06.22.      @.    07:53pm
mdesale29999@gmail.com
8806646250.

©Mahesh Desale # आठवण

#roseday
8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

*माझी मुलगी*

नसे नसावे काही क्षणभर ही
पण तुझा दूरावा नसावा..
माझी हसरी खेळती मुलगी
तुझा प्रेमझरा हृदयाशी असावा

तू अडीच वर्षांची सोन सोनुली
तुझा लाडी गोडीचा खेळ असावा
बोबड ही बोलत असेल पोरी
तुझा पापा म्हणणारा बोल असावा

तू कधी आई होते माझी..
कधी शिकवत असते नविन कावा
तुझा खेळ आनंदी आनंद ग..
माझ्या हरलेल्या डावाला रंग नवा

कुशीत शिरुन रंगत चढते..
अन् गिरवत असते स्वर्ग भाव
माझी मुलगी माझे जीवन रे..
देवा तिला कायम सुखात ठेव
- महेश
8806646250
11:23pm.   @.     09.02.22

©Mahesh Desale #माझी मुलगी
8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

लोक अकसर पूछ लेते है,
तूने कमाया ही क्या..
मै उनसे ना कुछ बोले हूए
दिल से कह देता हूं
जो तुमने नहीं कमाया
"सकून..!"
- महेश

©Mahesh Desale
8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

मोहब्बत भी अज़ीब चीज़ होती हैं जनाब..
दिल खो जाने तक पता हीं नहीं चलता
- महेश

©Mahesh Desale
8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

हिरवे स्वप्न

शाळा खुळी दुनियेची
चुकतो आहे शिकतो आहे
पाटी कोरी जिवनाची..
पुन्हा पुन्हा पुसतो आहे

लिहत असतो कधी कधी
मन मारून जगतो आहे
भाव भावना अन् शब्द..
नुसता खेळ बघतो आहे

आता व्हावी प्रगती..
ऐवढीच अपेक्षा करतो आहे
हरलेल्या मनाला पुन्हा..
हिरवे स्वप्न भरतो आहे
- महेश
8806646250.

©Mahesh Desale #DilKiAwaaz
8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

भुलायचे औषध ही हवे मना जवळ
न जाणो कितीदा भटकून जातो...
तुझी वाट पाहत रात्र रात्र जाते
अन् तू नयनी येऊन भटकून जाते

का असे खेळते 
का असे छेळते

मनाला वेड लावून वेडे
का माझ्या डोळी न येते

कितीदा म्हणावे घट्ट पकडेन पापण्यात
सांग तू डोळे मिटवून कुठे जाते...

मला सये गरज तुझी नितांत..
झोप अशी कशी निसटुन जाते
- महेश
8806646250

©Mahesh Desale sleeping

#Hope
8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

वेळ अन् काळ वाईट नसतो
वाईट असतो पैसा..
जो खिशात नसला की
तुमची किंमत कमी होते

मग सुरू होतो अपमान..
अनुभव अनुभूती अन् बरच काही
खांदयावर हात ठेवायला ही कोणी नसत
असतात फक्त दूषण लावायला माणसं

जगायचं असल्यावर मन मोठ करून ऐकायचं
हसायचं अन् म्हणायचं सर्व चांगल आहे..
चूक आपलीच होती ना सारच लुटून दिलं
आता फक्त आपली आहेत मोती सम अश्रू

जातील म्हणता जातील ही दिवस...
काही उणीवा जाणिवा हृदयी ठेवून जातील दिवस
हरायला ही काय होत तुझ्याजवळ अस..
बर झाल डोळे उघडून गेले दिवस...!
- महेश
19.11.21.      @.        08:33am
mdesale29999@gmail.com

©Mahesh Desale #safar
8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

चालायचं म्हणून चालायचं...!

चालायचं म्हणून चालायचं..
ऐरवी मी खुप थकलो ही आहे
मनाने हृदयाने भाव भावनांनी
पण त्यांना अस वाटत राहत
मी त्यांना सावरायला हव...!
पण त्यांना कळत नसेल का
ह्याला आधाराची गरज आहे..

दोन क्षण थांबायच डोळे मिटायची 
अन् गालात हसून पून्हा रस्ता पकडायचा

चालायचं म्हणून चालायचं...!
- महेश
8806646250.
mdesale29999@gmail.com
4:13am.      @.       01.11.21

©Mahesh Desale #AloneInCity
8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

घर

बंद डोळ्या आड एक घर आहे
हृदय त्याचे दार आहे..
कधी तरी प्रेम करशील ना वेड्या
जीवनाचं हेच सार आहे..

लाख कमवले अन् उधळले ही
पण समाधान मनी कुठे आहे
तुझे अन् माझे रीतेच होते ग्रहाणे
सांग यात प्रेम कुठे आहे..

पाणावतात डोळे कधी ओले कोरडे
आठवणीत ही आता काय आहे..
कधी येऊन जाशील का प्रिया
माझ्या हृदयी एक छान घर आहे
- महेश
8806646250.
05:33am.    @.     30.10.21
mdesale29999@gmail.com

©Mahesh Desale #home

#WritingForYou
8f3806f329714b939daf894f727a4381

Mahesh Desale

मला माहित आहे माझे ध्येय खुणावत आहे
मला ते बोलवते आहे..
उंच उडण्यासाठी सज्ज राहायला राहायला सांगते आहे
माझे पंख छाटण्यात आले आहे
पाय बांधण्यात आले आहे..
डोळ्यावर ही पट्टी लादण्यात आली आहे
पण त्यांना काय माहित..
मी सह्याद्री पुत्र अनादी अस्मानी झुलवतो झुकवतो
अन् उंच उडण्यासाठी पुन्हा भरारी घेतो..
- महेश
8806646250
mdesale29999@gmail.com
7:30am.      @.       23.10.21

©Mahesh Desale #Bicycle

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile