Nojoto: Largest Storytelling Platform
madhuri9188
  • 4Stories
  • 11Followers
  • 20Love
    42.3KViews

Madhuri P. Warwatkar

✨भावनांची सांगड घालुन...शब्द रत्न काव्यात मांडुन...☘️ हे जीवन सुंदर ☘️ काव्यात गुंंफण्याचा प्रयत्न करते...✍️

  • Popular
  • Latest
  • Video
923ae2e60b62be0c4029cbb442509ed0

Madhuri P. Warwatkar

प्रिय डिसेंबर....
 मला तुला काहीतरी आहे सांगायचे...✍️

जे दडले तुझ्या अंतरी 
स्वप्न ते आहे उकलायचे.... 
दुमडलेल्या त्या पानावरील 
शब्द आहेत जाणायचे...

विखुरलेली ती रत्न एकवटून
रचनेला आकार आहे द्यायचे...
हिरमुसलेले भाव गोंजारून
नवे गंध राग आहे फुलवायचे...

विश्वासाला पुनःच बळ देऊन
ध्येयाचे कळस आहे गाठायचे...
तुटलेल्या स्वप्नांना तुझ्या
नवे आकाश आहे द्यायचे....

©Madhuri P. Warwatkar
  #MadhuriPWarwatkar#मराठीलेखणी #Shayari #Emotional #Life #मराठीकविता

MadhuriPWarwatkarमराठीलेखणी Shayari Emotional Life मराठीकविता

923ae2e60b62be0c4029cbb442509ed0

Madhuri P. Warwatkar

🌹प्रिय दिनदर्शिका.....✍️

प्रिय दिनदर्शिका...
तु असतेस टांगलेली भींतीवर...
पण सारे काही चालत असते
तुझ्याच आदेशावर...

दिवस तारीख महीना
अमावशा पोर्णिमेचा तु आईना...
सण वार चतुर्थीचा उपवास
तुझ्याच ईशाऱ्यावर दैनंदीनीचा घाणा...

प्रत्येक तुझ्या पानावर तारखीवर
कितीतरी नोंदी असतात केलेल्या...
आणि तु नित्यनेमाने वर्षभर
प्रेमाने असतात त्या सांभाळलेल्या...

वर्ष संपताच दुसरी दिनदर्शिका
तुझ्या जागेवर विराजमान होते...
थोडं दुख: थोडं आनंद सोबत
जिवन नौका पुढे पुढे सरकत जाते...

Madhuri P. Warwatkar...✍️

©Madhuri P. Warwatkar
  #MadhuriPWarwatkar #मराठीलेखणी #Shayar #Life #Emotional
923ae2e60b62be0c4029cbb442509ed0

Madhuri P. Warwatkar

✨✨✨✨✨
हे जीवन... 
एक सुंदर मधुबन... 
त्या सभोवताल वेढलेलं 
नात्यांचं कुंपणं ...
कुठे सुगंधाची ऊधळन
कुठे काटेरी बंधन...
तरीही हे जीवन...
एक सुंदर मधुबन...
🌴🌴🌴🌴🌴🌴

©Madhuri P. Warwatkar #हेजीवन #MadhuriPWarwatkar
923ae2e60b62be0c4029cbb442509ed0

Madhuri P. Warwatkar

✨✨प्रिय...
 पहीली माझी कविता...✍️


महिमा माझ्या कल्पतरूंचा

माझ्याच ओठात होता घुटमळत...

त्याच तरुच्या श्वासासाठी

लेखणी घेतली मी विकत...


लेखणीच्या त्या स्पर्श धारेने

धैर्याचे पाऊल गेले सरकत

बघता बघता दुभंगलेल्या

उरीचे गेले घाव सुकत...


शब्दानी शब्द रेखाटताच

भावनेची घरंगळ थांबली...

'धेय्याची शिडी' नामकरणाने

पहिली माझी कविता फुलली...

©Madhuri P. Warwatkar #diary #Nojotoshayeri✍️#MadhuriPWarwatkar#marathikavita


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile