Nojoto: Largest Storytelling Platform
anishakiratkarve7754
  • 8Stories
  • 13Followers
  • 101Love
    0Views

Anisha Kiratkarve

  • Popular
  • Latest
  • Video
b7ddccde9355aca3ca30a92d33c4f95d

Anisha Kiratkarve

Unsplash तू मला खूप आवडतेस तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा  
वाटतो,अस म्हणणारा तो आजकाल आठवणींतच भेटतो

डोळे भरून पहायचय तुला तुलाच डोळ्यांत सामावून घेतो,
अस म्हणणारा तो डोळे भरून आले तरी रोज त्रास नवा देतो....

तुला घट्ट मिठी मारावी वाटते,तुझ्याच कुशीत आल्यावर धीर मला वाटतो,
अस म्हणणारा तो आनंद कोणा दुसऱ्याचाच मिठीचा घेतो....

मी तुझाच होतो ,तुझाच आहे आणि तुझाच राहीन अस म्हणणारा तो न जाणो हेच वाक्य आणखी कोणाकोणाला म्हणतो....

दुराव्यातील  प्रेम आणि प्रेमातील दुरावा त्याला कधी कळलाच नाही,किती केलं मी प्रेम त्यावरी पण तो फक्त माझ्याकडे कधी वळलाच नाही....

©Anisha Kiratkarve एकतर्फी प्रेम....💓💓✍️✍️ मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम संदेश शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह कविता मराठी प्रेम

एकतर्फी प्रेम....💓💓✍️✍️ मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम संदेश शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह कविता मराठी प्रेम #मराठीप्रेम

b7ddccde9355aca3ca30a92d33c4f95d

Anisha Kiratkarve

White आज पुन्हा एकदा वाटते कुठेतरी चुकतेय,
चांदण्या शोधता शोधता चंद्रा पासून मुकतेय......

आज पुन्हा एकदा वाटते ,तिथेच जावे नव्याने जिथे सोडून आले स्वतः ला,मन काही ऐकत नाही किती समजवाव मनाला....

आज पुन्हा एकदा वाटते कोणासाठी तरी मी खास आहे...
मन माझ ऐकत नाही ही फक्त खोटी आस आहे...

आज पुन्हा एकदा वाटते,विसरून जावे स्वतः ला,
ठेच लागली जिथं ,देव मानावं त्या दगडाला....

©Anisha Kiratkarve #Couple  छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री

#Couple छोटी कविता मराठी मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता मैत्री #मराठीकविता

b7ddccde9355aca3ca30a92d33c4f95d

Anisha Kiratkarve

Unsplash सांग कधी भेट झालीच आपली,

गालावर हसू आणशील का

अधुरे राहिले स्वप्न आपुले पूर्णत्वास नेशील का....

सांगशील का दुःख स्वतःचे , माझेही ऐकून
घेशील का ,
मी कधी ना तुझी जाहले ,तू तरी माझा होशील का .


तुझी यातना तुझे दुःख सारे काही ऐकून आहे,

विरहात तुझ्या मीही सख्या रोज प्रणयात  जळते आहे...

©Anisha Kiratkarve #lovelife  मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम स्टेटस

#lovelife मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम स्टेटस #मराठीप्रेम

b7ddccde9355aca3ca30a92d33c4f95d

Anisha Kiratkarve

Unsplash निखळ सौंदर्य मुलांचं ही असत,
प्रेमात असल आपण की ते नक्की आपल्याला दिसतं...

हळव्या मनाचा कोपरा दाटून तेव्हा येतो,
मनात असलेला चेहरा जेव्हा डोळ्यांसमोर येतो....


देखणी असतात मुलंही ,त्यांचेही असतात सुंदर डोळे
आज मी लिहिताना त्याच्या रुपासाठी केले आभाळ मोकळे...

लावण्य टिपले मुलींचे , मुल का मागे हे न कळे
त्याच्या हसण्यात दिसतो स्वर्ग मला देहात त्याच्या गुण वेगळे......

©Anisha Kiratkarve मुलांचे सौंदर्य....by Anisha.K फक्त प्रेम वेडे खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या

मुलांचे सौंदर्य....by Anisha.K फक्त प्रेम वेडे खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या #मराठीप्रेम

b7ddccde9355aca3ca30a92d33c4f95d

Anisha Kiratkarve

Unsplash आज अचानक ह्या क्षणी आनंदी हे मन झाले,
सुंदर असे स्वप्न पाहून मन माझे खुश झाले.....

पहिले ते स्वप्न मी आणि मनाशीच हसले
आज पहिल्यांदा माझे चीत्र मला हसताना दिसले....

शुभ्र अश्या डोळ्यांत स्वप्न उद्याचे दाटले,
झोपलेल्या स्वप्नांना माझे पटकन जगावेसे वाटले....

                                                               Anisha.K✍️✍️

©Anisha Kiratkarve #leafbook सुखद स्वप्न.... मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे

#leafbook सुखद स्वप्न.... मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त प्रेम वेडे #मराठीप्रेम

b7ddccde9355aca3ca30a92d33c4f95d

Anisha Kiratkarve

Unsplash एक अशी गोष्ट जी कधी व्यक्त नाही झाली,
मनातल्या मनात फक्त वाढत मात्र गेली....

कधी कधी तुझ्यापेक्षा तीच जास्त गोड वाटते,
तू नसलास जरी सोबत ती सावलीसारखी सोबत असते.....

गर्दीत असो वा एकांतात साथ कधीच सोडत नाही,
जिव्हाळ्याचे नाते तिचे नी माझे ती कधीच तोडत नाही....

तुझ्यापेक्षा जास्त मी तिच्यामध्ये रमते,
 गालावरती हसू आणणे तिलाही अचूक जमते....

नको समजू दुसरं काही तीच आहे माझ्या जीवनाची साठवण,
या जगण्यातल गुपित माझ ती तुझी आठवण....तुझी आठवण..

©Anisha Kiratkarve #lovelife तूझी आठवण मराठी कविता मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता

#lovelife तूझी आठवण मराठी कविता मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता #मराठीप्रेम

b7ddccde9355aca3ca30a92d33c4f95d

Anisha Kiratkarve

green-leaves शीतल चांदण्यात बसून मनाशीच हसून 
विचार करते नेहमी करेल का तो फोन ?
 भेटेन जेव्हा मला तो विचारेन मी त्याला ,
तू आहेस तरी कोण?

 जेव्हा जेव्हा भेटतोय मला,मी खूप विचार करते,
तुझ्याशिवाय जगणं हळू हळू मीही आता शिकते.

पहिल्यांदा भेटलास तू मला तेव्हा मनात कसलीच भावना दाटली नाही,पण जेव्हा तू म्हणाला मी आहे ना ; तेव्हापासून काळजी कश्याचीच कधीच वाटली नाही...

असच काही सा फरक पडतो तू बोलल्या नंतर ,प्रेमाचा हा अर्थ समजला तू जीवनात आल्या नंतर....

प्रश्न विचारतोय फोन करून मी खूप होते अस्वस्थ भेटशील जेव्हा तू मला सांगेन मी उत्तर मस्त मग कर उठाव ह्या मना अन् सांग उत्तर ह्या प्रश्नाचे करमते ना.....😇

                                                                Anisha.K✍️✍️

©Anisha Kiratkarve #GreenLeaves करमते ना....my first poetry about feelings of love💞 फक्त तुझ्यासाठी खर प्रेम मराठी प्रेम संदेश

#GreenLeaves करमते ना....my first poetry about feelings of love💞 फक्त तुझ्यासाठी खर प्रेम मराठी प्रेम संदेश #मराठीप्रेम

b7ddccde9355aca3ca30a92d33c4f95d

Anisha Kiratkarve

a-person-standing-on-a-beach-at-sunset आज असा कसा खेळ रंगला माझा माझ्याच मनावर्ती,
उगाच भांडते उगाच रुसते, नेमक बोलू कोणावरती...

खूप काही आहे बोलण्यासारखे ,पण बोलावेसे वाटत नाही,
कठीण होत आहे जगणे,जगता मला येतच नाही.....

आज पुन्हा वाटते तीच भीती पुन्हा आवडतोय एकांत
प्रेम कसे हे वाढत जाते काय कळेना दोघांत....

©Anisha Kiratkarve #SunSet  मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह

#SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह #मराठीकविता

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile