Nojoto: Largest Storytelling Platform
savidhankamble7427
  • 7Stories
  • 17Followers
  • 41Love
    0Views

Savidhan Kamble

#SimpleBoy😘 #PoemRighting❤️ #RespectingLove #FollowerDrBabasaheb🙏

  • Popular
  • Latest
  • Video
bcd50b0c33f228f6479f64fc0e43ca24

Savidhan Kamble

#ती अशीच आहे......
ती नेहमीच अबोल,
तिच्या गोड गळ्यातुन,
निघणारा एक-एक शब्द,
अलगद वेचण्यासाठी,
जेव्हा आसुसलेला असतो मी,
तेव्हा ती शहाणी,
मुद्दामच जास्त बोलणारच नाय,
मग तीला बोलत करण्यासाठी,
माझ्या शब्दांनी तिच सौंदर्य,
माझ्या प्रेमाच्या धाग्यात,
गुंफाव शब्दांच्या फुलांनी,
तेव्हा तीला ओढ लागते तीच कौतुक,
करणार्या शब्द फुलांची,
तेव्हा ती म्हणते कशी...
अजुन....Ok....हो.....का...!!
माझी ती...! #Savinam
bcd50b0c33f228f6479f64fc0e43ca24

Savidhan Kamble

ती अशीच आहे...
एकाच शब्दावर टिकून राहणारी
आपली बाजू पडू न देणारी
खुप स्वाभिमानी आहे ती,
तिच्या भावनांना ठेस लागल्यावर,
तिला खुप राग येतो,
तिच्या अभेद्य लाटांनी,
सागराला ही देते दाखवुन,
माझ अस्तित्व तुझ्यापेक्षा,
कमी नाय,
माझ्यामुळेच तर तुझ अस्तित्व आहे....
माझी ती....! #Savinam
#भांडण
bcd50b0c33f228f6479f64fc0e43ca24

Savidhan Kamble

छोट्याश्या रोपट्यासारखी, डुलडुल डोलणाऱ्या फुलासारखी, इंद्रधनुश्यातली सप्तरंग सारखी,
शांत नदीसारखी हसणारी,खळखळणाऱ्या झऱ्यासारखी वाहणारी,
भिरभिर डोळ्यांनी माझी वाट बघणारी,
मी गर्दीत दिसेनासा झाल्यावर कावरीबावरी होऊन मला शोधणारी,
अशीच आहे ती,
काळजी घे म्हणून स्वतः च पावसात भिजणारी,
कविता नाही समजली तरी व्वा खूप छान बोलणारी
माझ्या आठवणी जीवापाड जपणारी,
स्वज्वळ,गोड,प्रेमाच्या छायेत विसावा देणारी
मला पूर्ण करणारी, ती अशीच आहे...!! #Savinam
#LoveYou
bcd50b0c33f228f6479f64fc0e43ca24

Savidhan Kamble

आठवतय सखे तुला???
कॉलेजात असतांना,
नजरेला नजेर भिडायची??
मी नेहमीच तुझ्या सौंदर्याचा दिवाना होता,
अगदी नुकत्याच उमलेल्या गुलाबी गुलाबाच्या कळीच्या सौंदर्याचा दिवाना व्हावा,
तुझे काळेभोर केस नेहमीच मला विचलीत करायचे,
नेहमीच वाटायच तुझ्या काळ्याभोर केसांच्या सावलीत तुझ्या मांडीवर डोक ठेऊन झोपाव,

तुझ्या प्रत्येक गोष्टीचा शोध अन् वेध घ्यायचो,
कदाचित तु ही तोच शोध माझ्यात घेत असावी,
आपल्या दोघांनाही,
डोळ्यांची भाषा,
मनातील भावना,
कश्या न सांगताच उमजायच्या,

तु ही कधी बोलायच धाडस नाही केल,
अन् मी ही,
पण, 
मस्त असतय ना अस प्रेम???
जे प्रेमात पडुन देखील,
होकाराच्या प्रतीक्षेवर,
काठावर झुरायच,
पण हे मात्र खर आहे,
दोन वर्षा अगोदर जे फुललेल प्रेम होत,
ते आजही तसच टवटवीत आहे,

तु रोज स्वप्नात येऊन,
डोळ्यात डोळे घालुन,
तु तुझी केसांची बट कानामागे टाकुन,
माझ्या हातात हात देऊन,
आयुष्याची स्वप्न रंगवतेस,
कधीतरी प्रत्यक्षात देखील भेट ना??
मी वाट बघतोय......
#Savinam😘 #Savinam😘

Savinam😘

4 Love

bcd50b0c33f228f6479f64fc0e43ca24

Savidhan Kamble

काही नको मला तुझी #साथ हवी,
माझ्या आयुष्यात तू खास हवी,
मी तुझीच तू माझा
ह्या वचनांची आस हवी,
Face to Face chat होईल
एवढी तू पास हवीये,
प्रेमाच्या अनमोल घरट्यात 
सुखांची लाट हवी...!
अगं वेडे, म्हणजेच हवीये तुझी साथ...
हि #साथ सोबत जगण्याची,मरण्याची
शेवटच्या श्वासा पर्यंतची,
साऱ्या सुखदुःखात शामिल होण्याची,धीर देण्याची,
लाडाने जवळ घेण्याची, प्रेम करण्याची,
हातात हात घेऊन गप्पा करण्याची,
मस्ती मस्ती मध्ये भांडण करण्याची
रागावण्याची, फुगण्याची, रुसून बसण्याची,
हक्क गाजवण्याची,
माझ्या #प्रास्ताविकेची.,
आणि आपल्या मस्तीफुल आनंदी उज्वल आयुष्याची....!

#Savinam😘 #Savinam😘
bcd50b0c33f228f6479f64fc0e43ca24

Savidhan Kamble

ती म्हणते, तू संविधान अभिमान सर्वांचा
तर मी प्रस्तावना तुझ्या पूर्ण जीवनाची

ती म्हणते, मी प्रकाशमय पुनम ची रात्र
तू मन मोहून टाकणारे किरण चंद्राचे

ती म्हणते, तुझं मन पाण्यासारखं स्वच्छ,
तुझ्या मनात दिसे मला माझे प्रतिबिंब...

अगं वेडे हे मन तुझंच आहे,
पण ह्या मनाला ओढ लागलीये तुझ्या मिलनाची
ह्याला हवाय तुझा स्पर्श, तुझा सहवास
#मनाला,
बघायचीये, तुझ्या शुभ्र डोळ्यात लखलखणारी माझी प्रतिमा,
बघायचंय, हवेसोबत खेळणारे तुझे लाल केस
आणि खेळायचं तुझ्या लालकाळ्या केसांच्या कोमल छायेत,
दूर एकांतात हातात हात घेऊन
आपल्या आठवणींचे तरंग, तुझ्या तोंडांतून माझ्या कानापर्यंत येणारे शब्द आणि तुझा हवाहवासा गोड आवाज,
आणि मिठी मारून करायचेत ते वचनं
 कि 
येणारी प्रत्येक सकाळ तुझीमाझी असेल आणि असणार.....!!

#Savinam😘 #Savinam😘

Savinam😘 #मनाला

4 Love

bcd50b0c33f228f6479f64fc0e43ca24

Savidhan Kamble

छोट्याश्या रोपट्यासारखी, डुलडुल डोलणाऱ्या फुलासारखी, इंद्रधनुश्यातली सप्तरंग सारखी,
शांत नदीसारखी हसणारी,खळखळणाऱ्या झारीसारखी वाहणारी,
भिरभिर डोळ्यांनी माझी वाट बघणारी,
मी गर्दीत दिसेनासा झाल्यावर कावरीबावरी होऊन मला शोधणारी,
अशीच आहे ती,
काळजी घे म्हणून स्वतः च पावसात भिजणारी,
कविता नाही समजली तरी व्वा खूप छान बोलणारी
माझ्या आठवणी जीवापाड जपणारी,
स्वज्वळ,गोड,प्रेमाच्या छायेत विसावा देणारी
मला पूर्ण करणारी, ती अशीच आहे...!!
#माझं पागल पिल्लू #Savinam


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile